कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांचा देहत्याग

कांची कामकोटी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती (वय ८२ वर्षे) यांनी २८ फेब्रुवारीला सकाळी देहत्याग केला. कांचीपुरम् पीठाचे ते ६९ वे शंकराचार्य होते.

काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना सीबीआयकडून अटक

आयएन्एक्स् मीडिया आस्थापनातील ‘मनी लाँडरिंग’ (पैशांची अवैध देवाण-घेवाण) प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने….

होळी आणि रंगपंचमी यांच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठीचे निवेदन देण्यासाठी गेल्यावर एका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्तीची पोलिसांकडून चौकशी !

२७ फेब्रुवारी या दिवशी एका जिल्ह्यातील हिंदु जनजागृती समितीच्या तीन महिला कार्यकर्त्या आणि दैनिक सनातन प्रभातचे एक वाचक होळी अन् रंगपंचमी या निमित्ताने होणारे अपप्रकार…..

होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार थांबवण्याच्या संदर्भातील निवेदन द्यायला गेलेल्या एका शहरातील हिंदुत्वनिष्ठांवर लक्ष ठेवणारे पोलीस

होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार थांबवण्याच्या संदर्भातील निवेदने देण्यासाठी ठिकठिकाणी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांचे कार्यकर्ते प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटतात.

हिंदूंनो, होळीनिमित्त धर्मद्रोही करत असलेल्या तुमच्या बुद्धीभेदाच्या विरोधात जागृत व्हा !

होळी पेटवल्यानंतर अर्वाच्च भाषेत बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पहायला मिळते. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र दडलेले आहे; मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जाऊन परस्परांतील वैर चव्हाट्यावर आणण्यासाठीही बोंब मारली जाते.

मातृभाषेतील ३८ नवीन प्राथमिक शाळांना अनुमती न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू ! – प्रा. सुभाष वेलींगकर, भाभासुमं

शासनाने मातृभाषेतील ३८ नवीन प्राथमिक शाळांना अनुमती न दिल्यास तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी भारतीय भाषा सुरक्षा मंचचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलींगकर यांनी दिली आहे.

देशी गोवंश संवर्धन आणि गोशाळा व्यवस्थापन यांवर प्रत्यक्ष प्रशिक्षण देणार ! – विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

देशी गोवंश संवर्धनाविषयी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ती दिशा देण्यासाठी प्रत्यक्ष गोशाळांवरील प्रशिक्षण हा अभिनव आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून चालू करून पुढे संपूर्ण राज्यभर राबवण्याचा मानस आहे.

होळी आणि रंगपंचमी यांतील अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती अन् समविचारी संघटना यांची मोहीम !

होळीच्या संदर्भात ८ दिवसांपासून आमची मोहीम चालू आहे, तसेच निवेदनातील मागण्याचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करू’’ असे आश्‍वासन जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार यांनी दिले.