नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड !

श्रीरामनवमीच्या उत्सवानंतर औरंगाबाद, मुंगेर, नालंदा, भागलपूर आणि समस्तीपूर येथे उसळलेल्या दंगलींचे लोण आता नवादापर्यंत पोहोचले आहे. ३० मार्च या दिवशी सकाळी काही धर्मांधांनी नवादा येथील गोंदापूर चौकाजवळ असलेल्या श्री हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड केली.

(म्हणे) ‘श्रीरामनवमीला दंगल घडवण्यासाठी सरसंघचालकांकडून बिहारमधील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण !’ – तेजस्वी यादव

सरसंघचालक मोहन भागवत हे नुकतेच १४ दिवसांसाठी बिहारमध्ये येऊन गेले. या १४ दिवसांमध्ये त्यांनी येथील कार्यकर्त्यांना ’दंगल कशी भडकावयची ?’, याचे रीतसर प्रशिक्षण दिले. त्यांना श्रीरामनवमीच्या काळात बिहारमध्ये दंगल घडवून आणायची होती, असे हिंदुद्वेषी फुत्कार लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी येथे सोडले.

जम्मूमध्ये आतंकवाद्यांनी घरात घुसून केली पोलिसाची हत्या

येथील अनंतनागमधील बिजबेहडा भागातील काटू वापजान गावात रहात असलेले विशेष पोलीस अधिकारी मुश्ताक अहमद शेख यांची आतंकवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालून हत्या केली.

कर्नाटकमध्ये सत्ता आल्यास संघ आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांच्या मारेकर्‍यांना पाताळातूनही शोधून कारागृहात डांबू ! – अमित शहा

कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यापासून रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या २४ कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत. यातील २२ हत्या एकसारख्या पद्धतीने करण्यात आल्या आहेत. तरीही पोलीस निष्क्रीय आहेत. त्यांनी मारेकर्‍यांना अद्यापही पकडलेले नाही. परिणामी मारेकरी आजही समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत.

अमृतसर येथे पाकसाठी ७ मासांपासून हेरगिरी करणार्‍या एकास अटक

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था ‘आयएस्आय’साठी हेरगिरी करणार्‍या रवि कुमार याला अमृतसरमधून अटक करण्यात आली आहे. राज्य विशेष अभियान विभाग (एस्एस्ओसी) आणि भारतीय लष्कराची गुप्तहेर संस्था यांनी ही कारवाई केली.

मंगळुरू येथील भाजपचे नेते सुखानंद शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्यांअभावी मुक्तता

भाजपचे नेते सुखानंद शेट्टी यांच्या हत्येच्या प्रकरणातील सर्व आरोपींची येथील सहाव्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने २८ मार्च या दिवशी पुराव्यांअभावी मुक्तता केली.

गुजरातमध्ये देशद्रोह्यांकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

येथे दोन गटांत झालेल्या झटापटीच्या वेळी काही देशद्रोह्यांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.

‘हनुमान जन्मोत्सव’ म्हणण्याऐवजी ‘हनुमान जयंती’ म्हणणेच योग्य !

‘हनुमान चिरंजीव असल्याने त्याची जयंती साजरी करण्याऐवजी जन्मोत्सव साजरा करा’, अशा आशयाची चौकट सध्या सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. याविषयी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी शास्त्रोक्त परिभाषेत सांगितलेले स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.