नीरव मोदी आणि चोकसी यांच्या ११ राज्यांतील मालमत्तांवर धाडी

पंजाब नॅशनल बँकेतील ११ सहस्र ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी आणि मेहूल चोकसी यांनी भारतात परत यावे अन् अन्वेषण यंत्रणांना सामोरे जावे, यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत.

पंजाब नॅशनल बँकेच्या माजी उपव्यवस्थापकासह तिघांना अटक – ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने (सी.बी.आय्.ने) १७ फेब्रुवारीला अधिकोषाचे माजी उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी, एकल खिडकी योजनेचे (एस्.डब्ल्यू.ओ.चे) लिपिक मनोज खरात आणि हेमंत भट यांना अटक केली.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या कार्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे आशीर्वाद

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर गुरुजी यांची नुकतीच भेट घेतली.

सोलापूर येथे ब्रिगेडी संघटनांच्या विरोधामुळे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची सभा रहित !

१७ फेब्रुवारी या दिवशी खड्डा तालीम येथे ‘धर्मवीर बलीदान मास’ या विषयावर पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा रहित करावी, या मागणीचे निवेदन येथील संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ यांच्या वतीने येथील पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दिले. त्यानंतर पोलीस आयुक्त तांबडे यांच्या विनंतीवरून पू. भिडेगुरुजींनी सभा रहित केली आहे. 

हिंदुत्वनिष्ठांचा मानसिक छळ करणारे पोलीस !

हिंदु धर्मजागृती सभेच्या अनुमतीसाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस सकाळी ११ ते दुपारी ४ आणि सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.

घुसखोर बांगलादेशींना खोटी ओळखपत्रे करून देणार्‍या धर्मांधासह एकाला अटक

खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आदी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्‍या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मशीद बंदर परिसरातील एका दुकानात धाड टाकून अटक केले. खोटी कागदपत्रे विकत घेणार्‍यांनी जे पत्ते दिले आहेत, त्यामध्ये अ‍ॅन्टॉप हिल येथील झोपडपट्टीचा पत्ता आहे

कधी नव्हे एवढी हिंदूसंघटनाची आवश्यकता असतांना आणि अध्यात्माचा जराही अभ्यास नसतांना केवळ सनातनद्वेषापोटी सनातन संस्थेवर हीन शब्दांत टीका करणारे कथित संघ स्वयंसेवक !

रा.स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत एका कथित संघ स्वयंसेवकाने सनातन संस्थेवर जात्यंध टीका केली. संस्थेविषयीची ही जात्यंध आणि सनातनची अपकीर्ती करणारी टीका सामाजिक प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत आहे. त्यामुळे या टिकेचे खंडण वाचकांसाठी येथे देत आहोत.

अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे ११ जिल्ह्यातील सव्वा लाख हेक्टर क्षेत्र बाधित ! – कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर

विदर्भात दोन दिवसांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यांमुळे पिकांच्या झालेल्या हानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. ११ जिल्ह्यांतील ५० तालुक्यांमधील १ सहस्र ८६ गावांमधील १ लाख २४ सहस्र २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे एकत्रित शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय

येथील देवळाली कॅम्प येथे सर्व पक्ष, मंडळे आणि शिवप्रेमी यांच्या वतीने १९ फेब्रुवारीला एकत्रित शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या एकत्रित झालेल्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला.