कोटी कोटी प्रणाम !

• आज रामदासनवमी
• श्री अनंतानंद साईश प्रकटदिन, मोरटक्का (मध्यप्रदेश) (दिनांकानुसार)
• सनातनचे १८ वे संत पू. चत्तरसिंह इंगळे यांचा आज वाढदिवस
• सनातनच्या ६६ व्या संत पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर यांचा आज वाढदिवस

श्रीनगरच्या कारागृहात आतंकवाद्यांना मटण, कबाब आणि भ्रमणभाष सुविधा !

श्रीनगरच्या कारागृहात आतंकवाद्यांना मटण, कबाब आणि भ्रषणभाष सुविधा पुरवली जात असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. रुग्णालयावर आक्रमण करून ‘लष्कर-ए-तोयबा’चा अटकेतील ….

अयोध्या प्रकरण भूमीच्या वादाप्रमाणे हाताळणार ! – सर्वोच्च न्यायालय

अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणाकडे श्रद्धा किंवा भावनेचा विषय म्हणून पाहिले जाणार नाही. हा खटला भूमीच्या (जमिनीच्या) वादाप्रमाणे हाताळला जाईल

सैनिकांवर होणार्‍या दगडफेकीच्या विरोधात सैनिकांच्या मुलांची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार

काश्मीरमधील स्थानिक देशद्रोह्यांकडून सैनिकांवर होणार्‍या दगडफेकीच्या विरोधात आता निवृत्त सैन्याधिकार्‍यांच्या मुलांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ९ मार्चला जाहीर होणार

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून मुंबईत चालू होत आहे. या अधिवेशनात ९ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.

‘कार्टून’ वाहिन्यांवर ‘जंक फूड’, तसेच ‘कोका-कोला’ या शीतपेयाचे विज्ञापन दाखवण्यास केंद्र सरकारकडून बंदी

लहान मुलांच्या आरोग्यासंबंधित वाढत्या समस्यांच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने ‘कार्टून’ वाहिन्यांवर ‘जंक फूड’, तसेच ‘कोका-कोला’ या शीतपेयाचे विज्ञापन दाखवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

(म्हणे) ‘हा देश तुमच्या बापाचा आहे का ?’

भाजपचे खासदार विनय कटियार यांच्या ‘मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे’, या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना काश्मीरमधील ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे नेते फारूख अब्दुल्ला …

अमरावती येथे हिंदु धर्मजागृती सभा उधळून लावण्याची ‘भीम आर्मी’ची धमकी

येथे ११ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मजागृती सभा आयोजित केली आहे. ‘या सभेमुळे जातीय दंगली होतील. त्यामुळे सभेची अनुमती रहित करून हिंदु जनजागृती समितीवर बंदी घालावी