काँग्रेसने देशाचे विभाजन केल्याची फळे देश प्रतिदिन भोगत आहे !

काँग्रेसने भारतमातेचे तुकडे केले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या ७० वर्षांत देशाने त्याची फळे भोगली नाहीत, असा एकही दिवस गेला नाही, अशा घणाघाती शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर शरसंधान केले.

तुळजापूर शहर प्रवेशकर घोटाळ्याच्या प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा प्रविष्ट करा ! – जिल्हाधिकारी

श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणार्‍या भक्तांकडून तुळजापूर शहर प्रवेशकराच्या नावाखाली लाखो रुपयांची लूट करणारे ठेकेदार सीताराम उपाख्य राम विलास छत्रे

(म्हणे) भारतीय मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणार्‍यांना ३ वर्षांसाठी कारागृहात टाका ! – ओवैसी यांचा लोकसभेत कांगावा

भारतीय मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणार्‍यांना ३ वर्षांसाठी कारागृहात टाकण्याचा विशेष कायदा करावा, अशी मागणी एम्.आय.एम् पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत केली.

तमिळनाडूमध्ये देवीला सलवार-कमीज नेसवणार्‍या पुजार्‍यांची हकालपट्टी

मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्‍यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.

सर्वोच्च न्यायालयाकडून मिलिंद एकबोटे यांना अंतरिम अटकपूर्व जामीन संमत

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील हिंसाचार प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आलेले समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख श्री. मिलिंद एकबोटे यांना ७ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने २० फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जामीन संमत केला आहे.

रशियात हिंदु धार्मिक नेत्याचा धर्मांध ख्रिस्ती नेत्याकडून छळ

येथे वर्ष १९९० पासून रहात असलेल्या श्री. प्रकाश या हिंदु धार्मिक नेत्याचा तेथील ख्रिस्ती चर्चचा धर्मांध पदाधिकारी अलेक्झांडर डोरकीन याच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत …….

सोलापूर येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या माध्यमातून हिंदु वीरांनी दिली हिंदु राष्ट्राची ललकारी

येथे ७ फेब्रुवारीला पुंजाल क्रीडांगण मैदानावर हिंदु धर्मजागृती सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला जिज्ञासू, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

हिंदू संघटित झाल्यास हिंदु राष्ट्र आणण्यापासून आपल्याला कुणीही रोखू शकणार नाही ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

सनातन संस्था ही धर्मप्रसार करणारी आणि हिंदूंना धर्मशिक्षण देणारी संस्था आहे. सनातनचे आदर्श प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुत्वासाठी प्राणार्पण करणारे धर्मवीर संभाजी महाराज हे असून वर्ष २०२३ पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे.

मालवण येथे मत्स्य आयुक्त कार्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे नियोजन कोलमडल्याने तणाव पोलीस बंदोबस्तात कार्यशाळा पार पाडली

साहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने खेकडा, कालवे आणि शिंपले संवर्धन मार्गदर्शन कार्यशाळा  विनामूल्य आयोजित करण्यात आली होती.

धर्मसंस्थापनेसाठीची साधना म्हणून हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – श्री. चेतन राजहंस, प्रवक्ता, सनातन संस्था

सध्याच्या धर्मविहीन (सेक्युलर) व्यवस्थेमध्ये साधारण नागरिकांच्या जीवनातून धर्म विलुप्त झाला आहे. त्यामुळे सकाळी दुध देणार्‍यापासून डॉक्टरपर्यंत सर्व जण समाजाला लुटतात. प्रशासकीय अधिकारीच नव्हे, तर पोलीस अन् न्यायाधीश भ्रष्टाचारी आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now