लोकसभेत अर्थसंकल्प सादर : कररचनेत कोणताही पालट नाही

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात वर्ष २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीच्या कररचनेत कोणताही पालट केलेला नाही.

बेंगळुरू येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या

उत्तर बेंगळुरूच्या जे.सी. नगरमधील ४ धर्मांधांनी ३१ जानेवारीच्या रात्री ९ वाजता संतोष (वय २८ वर्षे) या भाजपच्या कार्यकर्त्याची भोसकून हत्या केली.

हिंदु धर्माचे रक्षण आणि उद्धार यांसाठी धर्मनिष्ठ राज्यकर्ते आवश्यक ! – श्री विद्यावारिधीतीर्थ स्वामीजी

अधर्माचे निर्दालन करण्यास भगवंत अवतीर्ण होतात, अशी ग्वाही स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये दिली आहे. स्वधर्म संरक्षण आणि उद्धार करण्यासाठी हिंदु धर्मावर निष्ठा असणारे राज्यकर्ते आवश्यक आहेत.

डार्विनचा सिद्धांत चुकीचाच : विद्यार्थ्यांना खरा इतिहास शिकवण्याची आवश्यकता ! – नासाचे माजी शास्त्रज्ञ प्रा. ओ.पी. पांडेय

माकडापासून मानवाची निर्मिती झाल्याचा डार्विनचा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे, असे प्रतिपादन नासाचे माजी शास्त्रज्ञ प्रा. ओ.पी. पांडेय यांनी केले आहे. लखनौ विद्यापिठात ते वेदांतील ज्योतिष आणि विज्ञान या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

चंदन गुप्ता यांच्या नातेवाइकांना ५० लाख रुपये हानीभरपाई मिळावी !

येथील हिंसाचारात ठार झालेले चंदन गुप्ता यांच्या नातेवाइकांना सरकारने ५० लाख रुपये हानीभरपाई द्यावी, तसेच त्यांना हुतात्म्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेने केली आहे.

चंद्रग्रहणाच्या दिवशी कर्नाटकचे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी करण्यात आली सत्यनारायणाची पूजा !

देशभरात ३१ जानेवारी या दिवशी दिसलेले खग्रास चंद्रग्रहण हे राजकारणाला अनुकूल नसल्याची भावना कर्नाटकमधील राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

संशयिताची ११ प्रकरणांत निर्दोष सुटका होण्यास उत्तरदायी पोलिसांवर कारवाई करणार का ?

गोवा राज्यातील धार्मिक स्थळांच्या तोडफोडीच्या प्रकरणी अटकेत असलेले संशयित फ्रान्सिस परेरा यांची १८ जानेवारी २०१८ या दिवशी चांदोर येथील आल्मा खुरीस प्रकरणी न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.

राहुल गांधी यांनी परिधान केले ७० सहस्र रुपयांचे जॅकेट

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे मेघालयमध्ये ३० जानेवारीला पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी ७० सहस्र रुपये किंमतीचे जॅकेट परिधान केले होते.

सनातनचे साधक किरण कुलकर्णी यांच्या बंधन या कथासंग्रहाचे प्रकाशन !

स्वानंद या संस्थेने आयोजित केलेल्या वार्षिक हास्यसंमेलन कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक श्री. किरण कुलकर्णी यांच्या बंधन या कथासंग्रहाचे २६ जानेवारी या दिवशी मुक्तांगण खरे मंदिर येथे प्रकाशन करण्यात आले.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now