विधीमंडळात शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याच्या प्रश्‍नावरून विरोधकांचा गदारोळ

मराठी राजभाषादिनानिमित्त २७ फेब्रुवारीला विधानसभेत पार पडलेल्या कार्यक्रमात ‘मराठी अभिमान गीता’तील शेवटचे म्हणजे सातवे कडवे वगळण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रखर विरोधामुळे धर्मद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित !

नवहिंद सोसायटीला २५ वर्षे पूर्ण झाल्याविषयी २६ फेब्रुवारी या दिवशी रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ मराठा मंदिरात हिंदु धर्मद्रोही श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

मशिदीसाठी हिंदूंनी भूमी दान केली, तर शिखांनी वर्गणी गोळा केली

पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील मूम गावातील हिंदु ब्राह्मणांनी मशिदीसाठी भूमी दान केली. याशिवाय शिखांनी मशीद उभारण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली.

कर्नाटकमध्ये इयत्ता पहिलीपासून कन्नड भाषा ‘सक्तीचा विषय’

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून कर्नाटकमध्ये पहिलीपासून कन्नड भाषा ‘सक्तीचा विषय’ असल्याचा निर्णय कर्नाटक सरकारने नुकताच घेतला आहे. खासगी, अल्पसंख्यांक, राज्य आणि केंद्रीय मंडळ

जम्मू-काश्मीरमध्ये इसिसचे अस्तित्व नाही ! – केंद्रीय गृह मंत्रालय

जम्मू-काश्मीरमध्ये इसिसचे अस्तित्व नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिले. श्रीनगर येथे एका आतंकवादी आक्रमणात एक पोलीस हुतात्मा झाल्याची घटना २५ फेबु्रवारीला घडली.

नागालॅण्डमध्ये मतदानकेंद्रात बॉम्बस्फोट

नागालॅण्ड विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीच्या वेळी तिजित जिल्ह्यातील एका मतदानकेंद्रात अज्ञातांनी गावठी बॉम्बचा स्फोट घडवून आणला.

नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला आणखी १ सहस्र ३२२ कोटी रुपयांना फसवल्याचे उघड

पंजाब नॅशनल बँकेला ११ सहस्र ३०० कोटी रुपयांना फसवणारे हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी १ सहस्र ३२२ कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा केला असल्याची माहिती पंजाब नॅशनल बँकेने ‘स्टॉक एक्सचेंज’ला नुकतीच दिली.

केंद्र सरकारकडून हज यात्रेकरूंसाठी तब्बल ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात

केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद केले असले, तरी हज यात्रेकरूंसाठीच्या विमानप्रवासात १५ ते ४५ टक्क्यांपर्यंत भाडेकपात केली आहे,

अधिकोषांतील भ्रष्टाचार उघडकीस आल्यावर ८ मासांपासून रिक्त असलेल्या ‘डेप्युटी गव्हर्नर’ या पदावरील नियुक्तीसाठी अर्थ मंत्रालयाकडून २ दिवसांपूर्वी तातडीने विज्ञापन !

अधिकोषांच्या कार्यावर लक्ष ठेवण्यासाठी अत्यावश्यक असलेले ‘डेप्युटी गव्हर्नर’, हे पद गेल्या ८ मासांपासून रिक्तच आहे. पंजाब नॅशनल बँक या अधिकोषासमवेत अन्यही काही भ्रष्टाचाराची प्रकारणे उघडकीस आल्यावर रिझर्व्ह बँकेतील हे पद भरण्यासाठी अर्थ मंत्रालयाने ३ दिवसांपूर्वी विज्ञापन दिले आहे.

शासनाने संमत केलेली भूमी कह्यात मिळण्यासाठी ५० वर्षांपासून खेटे मारूनही निवृत्त सैनिकास भूमीचा ताबा नाही !

वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभागी झालेले निवृत्त सैनिक श्री. चंद्रशेखर मल्लिकार्जुन जंगम यांना वर्ष १९६८ मध्ये सातारा येथील रविवार पेठ येथे शासनाने संमत केलेली भूमी ५० वर्षांपासून शासनाकडे चकरा मारूनही कह्यात मिळालेली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now