जयपूर येथील पखवाज (मृदंग) वादक छवी जोशी यांच्या पखवाजवादनाच्या वेळी साधकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या दैवी अनुभूती !

  जयपूर येथील पखवाजवादक आणि जवाहर कला केंद्रातील कार्यक्रम अधिकारी श्री. छवी जोशी यांनी १७.१२.२०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली. या वेळी श्री. छवी जोशी यांनी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संगीत विभागातील साधकांसमोर पखवाजवादन सादर केले. मागील लेखात आपण श्री. छवी जोशी यांचा पखवाज आणि पखवाजवादन यांविषयीचा भाव, तसेच ते पखावाज वाजवतांना … Read more

हिंदु समाज कौरवबुद्धीने नष्ट करण्याचा प्रयत्न !

कोरेगाव भीमा येथे मी गेल्या अडीच-तीन वर्षांत फिरकलेलोही नाही आणि माझ्यावर दंगल घडवण्याचे आरोप करण्यात येत आहेत. ज्यांच्या मुलाखतीमुळे दंगल झाली, ज्यांनी माझ्या सहभागाची माहिती दिली, त्या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. या हिंदु समाजाची तोडफोड करून, हिंदु समाज नष्ट करावा, यासाठी सर्व प्रयत्न करत आहे.

दहशत माजवणार्‍यांना चाप बसून शहरवासियांचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले ! – आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना

कोरेगाव भीमा येथील घटनेचे समर्थन कोणीही करू शकत नाही. त्यामुळे ३ जानेवारीला शहरासह जिल्ह्यातील समस्त दलित संघटनांनी पुकारलेल्या बंदला शहरातील व्यापारीवर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला; मात्र काही समाजकंटकांनी शहरामध्ये दहशत माजवत सहस्रो गाड्या फोडल्या, अधिकोष, वृत्तपत्रांची कार्यालये यांवर दगडफेक करून मोठी हानी केली.

‘पद्मावती’च्या विरोधात राजपूत करणी सेनेने पुन्हा एकदा रणशिंग फुंकले

वादग्रस्त ‘पद्मावती’ चित्रपटाच्या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची चेतावणी देत राजपूत करणी सेनेने या चित्रपटाच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकले. त्यांनी या चित्रपटावर आक्षेप घेत ‘दिग्दर्शक संजय लीला भन्साळी कारागृहाच्या बाहेर कसे ?’, असा प्रश्‍न उपस्थित करून याप्रकरणी भाजपला धडा शिकवण्याचीही चेतावणी दिली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी पुन्हा टळली

चारा घोटाळ्याच्या प्रकरणी दोषी असलेले लालूप्रसाद यादव यांच्यावरील शिक्षेची सुनावणी ५ जानेवारी या दिवशी पुढे ढकलली. सुनावणी पुढे ढकलली जाण्याची ही तिसरी वेळ आहे.

राज्यसभेत तिहेरी तलाकवरील विधेयक रखडले

लोकसभेत संमत झालेले तिहेरी तलाकबंदीवरील विधेयक राज्यसभेत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे संमत करण्यात भाजप सरकारला अपयश आले. परिणामी ते राज्यसभेत रखडले असून ते संमत होण्यासाठी सरकारला आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट पहावी लागणार आहे.

पू. भिडेगुरुजींच्या समर्थनासाठी कराड आणि वाई येथे सहस्रो हिंदुत्वनिष्ठ एकवटले

येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ दत्त चौकापासून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात सहस्रावधी हिंदू उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

ब्राह्मण व्यक्तीवर गुन्हे नोंदवून जातीय तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र ! – अ.भा. ब्राह्मण महासंघ

श्री. आनंद दवे यांचा कोरेगाव भीमा दंगलीशी कोणताही संबंध नाही. श्री. आनंद दवे किंवा संघटनेचे कोणतेही पदाधिकारी त्या काळात कोरेगाव भीमा येथे गेले नव्हते. दवे यांच्यावर नोंदवलेला गुन्हा म्हणजे केवळ ब्राह्मण व्यक्तीला अडकवून जातीय द्वेष निर्माण करण्याचे षड्यंत्र आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now