मंगळुरू (कर्नाटक) येथे भाजप तथा बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या : ४ धर्मांधांना अटक

येथून १६ कि.मी. अंतरावर असणार्‍या कतीपाल्ला येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी फलक लावण्याच्या वादावरून ४ धर्मांधांनी बजरंग दलाचे कार्यकर्ते दीपक राव (वय २८ वर्षे) यांची ३ जानेवारी या दिवशी निर्घृण हत्या केली.

भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या आक्रमणात पाकचे १२ सैनिक ठार !

भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून केलेल्या धडक कारवाईत पाकच्या १२ सैनिकांना ठार मारले. याशिवाय पाकच्या ४ चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या.

कोरेगाव भीमा येथील दंगल आणि राज्यातील आंदोलने यांमागे नक्षलवादी असल्याचा संशय

कोरेगाव भीमा येथे उसळलेली दंगल आणि त्यानंतर राज्यभर झालेली दलित संघटनांची आंदोलने यांमागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा संशय सुरक्षायंत्रणांनी व्यक्त केला आहे.

(म्हणे) ‘शासनाने कारवाई केली नाही, तर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही !’ – प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. आंदोलनात सहभागी झालेले ‘आम्हाला का मारले’ असा प्रश्‍न विचारत आहेत. कालच्या आंदोलनामुळे दलित समाजाचा राग आम्ही काही काळ दाबून ठेवला आहे

प्रकाश आंबेडकर आणि नक्षलवादी यांच्यातील संबंधांची चौकशी करावी ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

भीमा कोरेगावला झालेली दंगल आणि श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचा दुरान्वयेही संबंध नाही. नक्षलवाद्यांचा म्होरक्या असलेला मिलिंद तेलतुंबडे याचा भाऊ आनंद तेलतुंबडे हा एल्गार परिषदेच्या संयोजकांपैकी एक होता.

विलेपार्ले (मुंबई) येथे उमर खालिद याच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती नाकारली

नुकत्याच पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेमध्ये भडकावू भाषण करणारा ‘जेएन्यू’चा विद्यार्थी नेता उमर खालिद हा ४ जानेवारी या दिवशी विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात

तिहेरी तलाकबंदीच्या विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ : कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

तिहेरी तलाकवर बंदी घालणारे ‘मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक’ संमतीसाठी सरकारने ३ जानेवारी या दिवशी  राज्यसभेत मांडले. लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा देणार्‍या काँग्रेसने स्वत:च्या भूमिकेत पालट करत हे विधेयक आता निवड समितीकडे पाठवावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

एस्.एस्.आर्.एफ्.चे इंडोनेशियातील साधक श्री. रेन्डी इकारांतियो ५ व्या संतपदी विराजमान !

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या विदेशातील साधकांच्या शिबिराला ३ जानेवारी या दिवशी रामनाथी येथील सनातन आश्रमात उत्साहात प्रारंभ झाला.

सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि समीर गायकवाड यांची निर्दोष मुक्तता होईल ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

हिंदूंना संघटित करण्याचे कार्य सनातन करत असल्याने सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना हेतूपुरस्सर हत्येच्या खटल्यांमध्ये गोवण्यात आले आहे; मात्र या दोघांचीही निर्दोष मुक्तता होईल, असा विश्‍वास अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी व्यक्त केला.

मुंबईतील मुसलमान संघटनांचा विधेयकाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय

केंद्र सरकारने तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरवणारे विधेयक लोकसभेत संमत केल्याने मुसलमान समाजामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now