कोरेगाव भीमा प्रकरणाचे राज्यभर हिंसक पडसाद

कोरेगाव भीमा प्रकरणाचे राज्यभर हिंसक पडसाद

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील प्रकरणाचे २ जानेवारीला सकाळपासून राज्यभरात पडसाद उमटले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, नगर, धुळे इत्यादी जिल्ह्यांत जमावाने बसगाड्यांवर दगडफेक केली.

पुलवामा आक्रमणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

पुलवामा आक्रमणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली

जैश-ए-महंमद या जिहादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी ३१ डिसेंबरला पूलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाले.

पाकमधील बलात्कारपीडित हिंदु महिलेला पोलीस संरक्षण देण्याचा पाक न्यायालयाचा आदेश

पाकमधील बलात्कारपीडित हिंदु महिलेला पोलीस संरक्षण देण्याचा पाक न्यायालयाचा आदेश

एक बलात्कारपीडित हिंदु महिला आणि तिचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याचा आदेश सिंध उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. पाकमधील एका प्रभावशाली परिवारातील एका व्यक्तीने एका हिंदु महिलेवर

अमेरिकेचा पाकला दणका : २५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखले

अमेरिकेचा पाकला दणका : २५५ दशलक्ष डॉलरचे अर्थसाहाय्य रोखले

अमेरिकेचे राष्ट्र्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देत असलेले २५५ दशलक्ष डॉलरचे साहाय्य रोखले आहे. पाकिस्तानने त्यांच्या देशातील आतंकवाद्यांच्या तळांवर प्रथम कारवाई करावी.

(म्हणे) वैचारिक कट्टरवादाविषयी बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ ! – विखे-पाटील

(म्हणे) वैचारिक कट्टरवादाविषयी बोटचेप्या भूमिकेमुळे समाजकंटकांना बळ ! – विखे-पाटील

राज्य सरकारने सातत्याने वैचारिक कट्टरवादाविषयी उदासिन आणि मवाळ भूमिका घेतल्यामुळे सनातन आणि संभाजी भिडे यांसारख्या समाजविघातक घटकांना बळ मिळते आहे.

महाराष्ट्रात दंगलसदृश्य स्थिती असल्यामुळे योग्य ती काळजी घ्या !

महाराष्ट्रात दंगलसदृश्य स्थिती असल्यामुळे योग्य ती काळजी घ्या !

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये हिंसाचार तसेच जाळपोळ झाल्यामुळे दंगलसदृश स्थिती निर्माण झाली आहे. काही संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

हिंदु धर्मजागृती सभेची सेवा ही श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याची संधी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु धर्मजागृती सभेची सेवा ही श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याची संधी ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

हिंदु धर्मजागृती सभा ही कोणा एका संघटनेची सभा नसून सर्व हिंदूंची सभा आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठीची सभा आहे. या सभेत सेवा करून आपल्या प्रत्येकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा संपादन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तरी तन, मन, धन यांपैकी कुठलाही त्याग करून धर्मप्रेमी हिंदू ही ईश्‍वरी सेवा करू शकतात.

सिद्धेश्‍वर मंदिराजवळील शहाजीरअली दर्ग्यासमोरील दुभाजकावर असलेले अतिक्रमित थडगे हटवा !

सिद्धेश्‍वर मंदिराजवळील शहाजीरअली दर्ग्यासमोरील दुभाजकावर असलेले अतिक्रमित थडगे हटवा !

येथील सिद्धेश्‍वर मंदिराजवळील शहाजीरअली दर्ग्यासमोरील दुभाजकावर असलेले अतिक्रमित थडगे हटवावे, या मागणीचे निवेदन अखिल भारत हिंदु महासभेचे शहर उपाध्यक्ष सुधाकर बहिरवाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना नुकतेच देण्यात आले.

२ वर्षांत आलेल्या ५ सहस्र ६७१ तक्रारींपैकी केवळ ११० जणांवर गुन्हा प्रविष्ट

२ वर्षांत आलेल्या ५ सहस्र ६७१ तक्रारींपैकी केवळ ११० जणांवर गुन्हा प्रविष्ट

भ्रष्टाचाराच्या विरोधात कार्यरत असलेल्या राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागील २ वर्षांत नोंद झालेल्या ५ सहस्र ६७१ तक्रारींपैकी केवळ ११० जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. ४ वर्षांत विभागाकडे प्रविष्ट झालेल्या गुन्ह्यांपैकी केवळ २५ प्रकरणांत शिक्षा झाली असून १६० जणांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मागील ४ वर्षांपासून विभागाकडे तब्बल २०० प्रकरणांचे अन्वेषण प्रलंबित आहे.

विधी शाखेच्या अभ्यासक्रमाची परीक्षेतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हानीची शक्यता

विधी शाखेच्या अभ्यासक्रमाची परीक्षेतील अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हानीची शक्यता

मुंबई विद्यापिठाच्या विधी शाखेच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी सूची घोषित करण्यात आली. पहिल्या सत्राची परीक्षा २० दिवसांवर आली असतांनाच प्रवेश चालू असल्याने त्यांची शैक्षणिक हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कुलगुरूंपर्यंत हा विषय नेला आहे.