राममंदिर नाही, तर वर्ष २०१९ मध्ये मोदी सरकारही नाही ! – आखाडा प्रमुखांची चेतावणी

राममंदिर बांधले नाही, तर वर्ष २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही जिंकणार नाहीत, अशी चेतावणी कुंभपर्वासाठी प्रयागराज येथे आगमन झालेल्या आखाड्यांच्या महंतांनी दिली आहे.

हिंदुद्वेष्ट्या साम्यवाद्यांचा दुतोंडीपणा !

हिंदूंच्या प्रत्येक सणाला मेणबत्तीवाले जागृत होतात आणि त्या विरोधात निषेध करत असतात; परंतु ३१ डिसेंबरचे वारे वाहू लागले की, यांच्या मेणबत्त्या विझतात.

कर्नाटकमध्ये श्रीरामाविषयी आक्षेपार्ह लिखाण करणारे लेखक के.एस्. भगवान यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट

स्वपक्षाचा आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा अवमान झाल्यावर ‘दी अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावर आक्षेप घेणारी काँग्रेस कर्नाटकमध्ये सत्तेवर असतांना प्रभु श्रीरामाचा अवमान करणारे लेखक भगवान यांच्या पुस्तकावर बंदी का घालत नाही ?

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करणार

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यात सर्वधर्मियांसाठी ‘आध्यात्मिक विभाग’ स्थापन करण्याचा प्रयत्न चालू केला आहे, सर्वधर्मियांच्या नावाखाली हिंदूंव्यतिरिक्त केवळ अन्य पंथियांनाच यातून सुविधा मिळतील, हे वेगळे सांगायला नको !

इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांचा दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजात गोळीबाराचा सराव !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने देहली आणि उत्तरप्रदेश येथून अटक केलेल्या इस्लामिक स्टेटच्या १० आतंकवाद्यांनी दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांच्या आवाजाच्या वेळी गोळीबाराचा सराव केला होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

३१ डिसेंबरला रात्रभर पब, बार, हॉटेल चालू रहाणार !

३१ डिसेंबरला ख्रिस्त्यांचे नववर्ष साजरे करायला अनुकूल वातावरण निर्माण करून देणारे सरकार त्यामुळे घडणारे अपघात, बलात्कार, छेडछाड यांसारख्या गुन्ह्यांचे दायित्व घेणार का ? ‘ख्रिस्ती नववर्षाचा जल्लोष म्हणजे पोलीस यंत्रणेवर ताण’ !

(म्हणे) ‘२ पेक्षा अधिक अपत्यांना जन्म द्या !’ – आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

२ किंवा २ पेक्षा अधिक अपत्य होऊ द्या, असे आवाहन आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. ‘या आवाहनाला हिंदू नव्हे, तर अल्पसंख्य समाज नक्की प्रतिसाद देणार आणि भविष्यात त्याचा फटका हिंदूंना बसणार’, हे चंद्राबाबू नायडू यांच्या लक्षात कसे येत नाही ?

काश्मीरमध्ये पुन्हा सैनिकांवर धर्मांधांकडून दगडफेक

येथे २९ डिसेंबरला सैन्याने एका चकमकीत ४ आतंकवाद्यांना ठार केले; मात्र त्या वेळी स्थानिक देशद्रोही धर्मांध युवकांनी सैनिकांवर दगडफेक केली. त्यांच्यावर सैनिकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

रत्नागिरी येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

आज शहरातील मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडिअममध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


Multi Language |Offline reading | PDF