साधकांना सूचना

३१.१२.२०१७ या दिवशी सनातनचे तीव्र आध्यात्मिक त्रास असणारे साधक, ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेले साधक आणि संत यांना सकाळी ८.१५ ते ९.१५ या वेळेत बसून नामजप करणे सहज शक्य असल्यास त्यांचा नेहमीचा नामजप करावा.

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून हिंदु महिलेची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

चटगांव जिल्ह्यातील गोंदमी येथील रहिवासी श्री ज्योतिर्मय देव यांच्या पत्नी मीनु राणी देव (वय ३४ वर्षे) यांची २६ डिसेंबला रात्री धर्मांधांनी हत्या केली.

इतिहासाचे विकृतीकरण करणार्‍या भन्साळींवर सरकार काय कारवाई करणार आहे ?

संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या वादग्रस्त चित्रपटाचे नाव पालटून ते पद्मावत असे करावे, तसेच घूमर या गाण्यातही पालट करावा, अशी सूचना सेन्सॉर बोर्डाच्या ६ सदस्यीय समितीने केली आहे.

भीमा-कोरेगाव लढाई : पेशव्यांच्या गनिमी कावा लढाईतील एक सोनेरी पान

वर्ष १८१८ मध्ये झालेल्या भीमा कोरेगांव लढ्याविषयी सध्या बरेच अपसमज पसरवले गेले आहेत. त्या वेळी इंग्रजांनी मराठ्यांचा पाडाव केला, असा खोटा इतिहास सांगितला जात आहे.

भारतातील जागृत तीर्थस्थानांप्रती राज्य सरकार आणि मंदिर प्रशासन यांची अक्षम्य उदासीनता !

आपल्या देशातील, विशेषतः हिमालयातील केदारनाथ, बद्रीनाथ, रुद्रप्रयाग आदी ठिकाणी तीर्थयात्रेला जाणार्‍या भाविकांसाठी सरकारकडून आध्यात्मिक स्तरावर कोणतीही सुविधा किंवा साहाय्य करण्यात येत नाही.

प्रतिलोम गतीने अभ्यंग (मालीश) करणे

प्रतिलोम गतीनेे अभ्यंग करणे, म्हणजे हृदयाच्या दिशेने किंवा गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने शरिरात तेल जिरवणे.

झोकून देऊन सेवा करणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेमुळे पदोपदी गुरुकृपेची अनुभूती घेणारे पुणे येथील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. श्यामकांत पेंडसे (वय ७५ वर्षे) !

मूळचे मुंबई येथील आणि सध्या पुण्यात रहाणारे श्री. श्यामकांत पेंडसेआजोबा म्हणजे उत्कट भावाचा झराच आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त निघालेल्या दिंडीत शेवटपर्यंत चालत सहभागी होणे

पुण्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त दिंडी निघाली होती. मी प्रारंभी चारचाकी गाडीत बसलो होतो; पण दिंडी चालू झाल्यावर मी चारचाकीतून उतरून एक पाय अधू असूनही शेवटपर्यंत चाललो.


Multi Language |Offline reading | PDF