(म्हणे) ‘नाताळचा विरोध करणार्‍यांचे डोळे काढू !’

पंजाबमध्ये कोणत्याही सणात बाधा आणण्याची अनुमती नाही. जर कोणी तुमच्याकडे डोळे मोठे करून पहात असेल, तर आम्ही त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी पंजाबचे काँग्रेस सरकारमधील कॅबिनेटमंत्री नवज्योतसिंह सिदधू यांनी नाताळच्या एका कार्यक्रमात दिली.

(म्हणे) ‘देशातील ध्रुवीकरणाच्या विरोधात लढले पाहिजे !’ – कार्डिनल बासेलियस क्लेमीस

कार्डिनल यांनी आरोप केला की, सरकार मिशनरींना विरोध करणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी निरपराध्यांवर आणि गरिबांवर कारवाई करते. यामुळे सरकारवरील विश्‍वास न्यून होत आहे.

लवळे (जिल्हा पुणे) येथे सनबर्न फेस्टिव्हल होऊ देणे सुरक्षिततेच्या दृष्टीने घातक !

संरक्षण खात्याच्या अंतर्गत उच्च ऊर्जा सामग्री अनुसंधान प्रयोगशाळा (एचईएमआरएल) सनबर्न फेस्टिव्हलच्या प्रस्तावित जागेपासून जवळच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या कार्यक्रमाला हरकत घेऊन सनबर्न फेस्टिव्हल लवळे येथे होऊ देऊ नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेच्या वतीने १० कोटी रुपयांचा दावा ठोकून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न !’

सनातन संस्थेवर बंदी घातली जात नाही. सनातन संस्थेने माझ्यावर १० कोटी रुपयांचा दावा ठोकून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यासारख्या विरोधी पक्षनेत्याची अशी अवस्था असेल, तर सर्वसामान्य व्यक्तींचे काय ?- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील

तोंडी तलाक अवैध ! – युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

युरोपीय महासंघाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच झालेल्या एका सुनावणीच्या वेळी शरीया कायद्यानुसार झालेला तलाक वैध मानण्यास नकार दिला.

कोणत्या आरोपात तथ्य आहे हेही न कळणारे पोलीस !

प्रा. मानव यांनी भाषणात हिंदु धर्म, देवता, साधू-संत यांच्यावर टीका करू नये, यासाठी पोलिसांना निवेदन दिले होते; मात्र पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच १४९ (कारणे दाखवा)ची नोटीस दिली.’               

प्रत्येकाने ‘रेड सिग्नल’ हे पुस्तक वाचले पाहिजे ! – आमदार लोढा

‘लव्ह जिहाद’रूपी छुपे आक्रमण रोखण्यासाठी हिंदु माता भगिनींनी सज्ज झाले पाहिजे. यासाठी ‘लव्ह जिहाद’ या विषयावरील हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘रेड सिग्नल’ या नावाने गुजराती भाषेतील दुसर्‍या ग्रंथाचे प्रकाशन भाजपचे आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.

देशात ३८ टक्के लोकांना गंभीर मानसिक आजार, तर केवळ ८ टक्के लोक मानसिकदृष्ट्या सक्षम ! -सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मानसिक आरोग्यासंबंधी लोकांमध्ये जागृती करणे, हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट आहे. ५० सहस्र लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यातील प्रत्येकाला मानसिक स्वास्थ्याविषयी १० प्रश्‍न विचारण्यात आले.

काँग्रेसचे लोक हनुमानाऐवजी टिपू सुलतानची पूजा करतात, हे दुर्दैवी ! – योगी आदित्यनाथ

आपल्या समृद्ध परंपरा सोयीस्करपणे विसरून हिंदु धर्माचा अपमान करण्याचा प्रकार कर्नाटकात चालू आहे. १८ व्या शतकात टिपू सुलतानचे राज्य होते. त्याची जयंती साजरी करण्याचे नेमके औचित्यच हिंदु धर्म आणि संस्कृतीचा अपमान करण्यासारखे आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now