(म्हणे) ‘फसवणुकीची २५ वर्षे विसरू नका, बाबरी मशीद बांधा !’

उत्तरप्रदेशच्या काही शहरांमध्ये बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीची मागणी करणारी भित्तीपत्रके लावण्यात आली आहेत. या पत्रकाद्वारे बाबरी मशीद उभारणीसाठी आंदोलन चालू करण्याचे संकेत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या संघटनेने दिले आहेत.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांच्या धार्मिक मिरवणुकीच्या वेळी हिंदूंवर आक्रमण !

येथील नानपारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणार्‍या गुरगुट्टा गावामध्ये प्रत्येक वर्षी ‘बारावफात’ या सणाच्या वेळी मुसलमानांकडून मिरवणूक काढली जाते.

शिवसेनेने श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकावला !

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिलेल्या आव्हानाला उत्तर देत शिवसेनेने ६ डिसेंबरला श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवला.

ब्रिटीश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी क्षमा मागावी ! – लंडनचे महापौर सादिक खान

ब्रिटीश सरकारने वर्ष १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बागेतील हत्याकांडासाठी क्षमा मागायलाच हवी. या घटनेसाठी क्षमा मागण्याची वेळ आली आहे, असे मत लंडनचे महापौर सादिक खान यांनी व्यक्त केले.

गडचिरोलीत पोलीस आणि सैन्य यांच्याकडून ७ नक्षलवादी ठार

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात ६ डिसेंबरला पहाटे झालेल्या चकमकीत पोलिसांनी ७ नक्षलवाद्यांना ठार केले. यात ५ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

अकार्यक्षम पोलीस !

‘गोव्यातील तरुणी, महिला यांच्यावर अत्याचार होतात. तसेच गोव्यात पर्यटक म्हणून आलेल्या महिलाही चोर्‍या, विनयभंग, बलात्कार अशा विविध अत्याचारांना बळी पडत आहेत.

कपिल सिब्बल आमचे अधिवक्ता असले, तरी न्यायालयातील त्यांचा युक्तीवाद अयोग्य ! – सुन्नी वक्फ बोर्ड

कपिल सिब्बल आमचे अधिवक्ता आहेत; पण ते एका राजकीय पक्षाचे नेतेही आहेत. त्यांनी न्यायालयात केलेला युक्तीवाद चुकीचा आहे. आम्हाला लवकरात लवकर यावर तोडगा हवा आहे,

(म्हणे) ‘मी माणूस आहे, मोदी यांच्यासारखा नाही !’

भाजपमधील माझ्या मित्रांनो, मी माणूस आहे. मी नरेंद्र भाईंसारखा नाही. त्यामुळे माझ्याकडून चुका होतात. त्यामुळेच आयुष्यात रंगत येते. माझी चूक लक्षात आणून दिल्याविषयी धन्यवाद !

…तर पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना आदेश देऊन औरंगजेब, अफझलखान यांच्या कबरी खणून उद्ध्वस्त कराव्यात ! – उद्धव ठाकरे

औरंगजेब आणि अफझलखान यांच्या थडग्यांची आज तीर्थस्थाने बनली आहेत. हे संस्कृतीच्या विरोधात आहे. मोगल राजवटी म्हणजे क्रौर्याचा अतिरेक होत्या.

बांगलादेशमध्ये प्रशासन आणि पोलीस यांच्या साहाय्याने हिंदूंच्या मंदिरांना कह्यात घेण्याचा धर्मांधांचा प्रयत्न

नारायणगंज जिल्ह्यातील पागला बाझार येथील श्री बाबा पागलनाथ आणि श्रीराम-सीता मंदिर यांना बळजोरीने कह्यात घेण्यासाठी जातीय श्रमिक लीग या कट्टरवादी धर्मांध संघटनेचे सचिव अल्हाज कौसर अहमद पोलाश याने स्थानिक पोलीस आणि महसूल उपायुक्त यांच्या साहाय्याने प्रयत्न चालू केले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now