हिवाळी अधिवेशनात देवस्थाने कायद्याच्या कक्षेत आणणार ! – भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंतर्गत येणार्‍या देवस्थानांसाठी पंढरपूर आणि शिर्डी देवस्थानांच्या धर्तीवर कायदा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल.

ईदला मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण

देशभरात ईद साजरी करण्यात आली. त्या वेळी अनेक ठिकाणी लावण्यात आलेले ध्वनीवर्धक, मिरवणुका आणि भोंगे यांचा आवाज १०० डेसिबलहून अधिक होता. हिंदूंच्या सणांच्या वेळी कायदा दाखवून, प्रसंगी मारहाण करून ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणारी पोलीस यंत्रणा ईदच्या वेळी कुठे होती ?

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे एन्आयए आणि पोलीस यांच्यावर धर्मांधांचे आक्रमण

पंजाबच्या लुधियाना येथे रवींद्र गोसाई या रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि गाझियाबाद पोलीस यांनी नहाली या गावात…..

शफीन जहां इसिसच्या संपर्कात होता ! – एन्आयएची माहिती

केरळमधील लव्ह जिहाद प्रकरणातील अखिला अशोकन् हिच्याशी विवाह केलेला शफीन जहां इसिसच्या २ आतंकवाद्यांच्या संपर्कात होता, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) दिली आहे.

कोलकाता येथील कारागृहात इसिसचा आतंकवादी मुसाकडून सुरक्षारक्षकाचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न

गेल्या वर्षी बंगालमधून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी महंमद मोसीउद्दीन उपाख्य अबू मुसा याने ३ डिसेंबरला सकाळी कोलकात्याच्या अलीपूर मध्यवर्ती कारागृहात एका सुरक्षारक्षकाचा चाकूने शिरच्छेद करण्याचा प्रयत्न केला.

हिंदूंना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे, ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

कायद्याचे पालन करणार्‍या हिंदूंना प्रत्येक वेळी कायद्याचा बडगा दाखवला जातो आणि कायदा मोडणार्‍या अन्य धर्मियांना नेहमीच सवलत दिली जाते. हे म्हणजे हिंदूंना कायदा आणि अन्य धर्मियांना लाभ असेच झाले. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी केले.

(म्हणे) ‘काश्मीरमध्ये भारतावर प्रेम करणारा वर्ग मोठा !’ – भाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षायंत्रणा अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आतंकवाद्यांशी लढा देत आहे. सैन्याचे अधिकारी, तसेच स्थानिक पोलिसांचे यात मोठे योगदान आहे.

बहराईच (उत्तरप्रदेश) येथे चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केल्यावर पोलिसांचे पलायन

येथील दर्गा शरीफ भागात एका महिलेकडील मौल्यवान वस्तूंची चोरी आणि विनयभंग या प्रकरणात ३ आरोपींना पकडण्यासाठी ककरही या गावात पोलिसांनी रात्रीच्या वेळी धाड घातली

हिंगोली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड !

गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार राजीव सातव यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नगराध्यक्षांचे कार्यालय आणि शासकीय विश्रामगृहात घुसून तोडफोड केली, तर काही तरुणांनी राज्य परिवहनाच्या बसगाड्यांवर दगडफेक केली.

केरळमधील अर्धनारीनटेश्‍वर मंदिरात लाल झेंडा आणि घोषणा रंगवून मार्क्सवादी गुंडांनी विटंबना केली

दक्षिण केरळ भागातील तमिळनाडू सीमेजवळ असलेल्या परस्साला येथील अतिप्राचीन काळातील अर्धनारीनटेश्‍वर मंदिरात सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या गुडांनी त्यांच्या पक्षाचे लाल झेंडे लावले, तसेच विविध रंग वापरून पक्षाच्या घोषणा रंगवल्या. यामुळे मंदिराची पवित्रता भंग होऊन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.