रामजन्मभूमीवर केवळ राममंदिरच हवे, मशीद उभारू देणार नाही ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

अयोध्येतील रामजन्मभूमीवर केवळ राममंदिरच उभारण्यात येईल. तेथे प्रतिकात्मक स्वरूपातही मशीद उभारू देणार नाही, असे परखड प्रतिपादन पुरी (ओडिशा) येथील पूर्वाम्नाय गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे केले.

गोमातेला राष्ट्रीय पशू घोषित करा !

गोमातेच्या रक्षणासाठी तिला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी कर्नाटकमधील विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या ‘धर्मसंसदे’त करण्यात आली. या विषयीचा ठरावही या वेळी मांडण्यात आला.

नमाजासाठी निर्माण केलेली अनधिकृत वास्तू पाडा ! – मद्रास उच्च न्यायालय

नियमांचे उल्लंघन करून नमाजासाठी निर्माण केलेली अनधिकृत वास्तू जमीनदोस्त करावी, असा आदेश मद्रास उच्च न्यायालयाने दिला आहे. तिरुवरुर जिल्ह्यातील मुथुपेट्टाई पंचायत येथे ही अनधिकृत वास्तू उभारण्यात आली आहे.

भारतीय मुसलमान रामाचे वंशज असल्याने त्यांनी राममंदिर उभारण्यासाठी साहाय्य करावे ! – भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री गिरीराज सिंह

भारतीय मुसलमान रामाचे वंशज आहेत. त्यामुळे त्यांनी अयोध्येतील मंदिराच्या उभारणीसाठी साहाय्य करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे नेते गिरीराज सिंह यांनी केले आहे.

हिंदूंचा सर्वनाश होतांना त्याकडे मूकपणे पहाणार्‍या राज्यकर्त्यांचा धिक्कार ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

आज भारतात १०० कोटी हिंदू आहेत. तरीही हिंदूंची स्थिती दयनीय आहे. सत्तेत येण्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून पुष्कळ आश्‍वासने दिली जातात; मात्र सत्ता प्राप्त झाल्यावर नेते धर्मनिरपेक्ष होतात.

लोकहो, अन्यायकारक न्यायप्रणालीविरुद्ध लढण्यासाठी कटीबद्ध व्हा !

‘न्यायदान अचूक होत नाही, न्याय वेळेत मिळत नाही आणि मिळाल्यास त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नाही, म्हणजेच न्याय मिळूनही तो न मिळाल्यासारखाच असतो’, हे भारतातील न्यायव्यवस्थेतील वास्तव आपण नेहमी अनुभवतो.

कल्याण येथे शासकीय वसतीगृहातील जेवणात अळ्या सापडल्या

कल्याण बिर्ला महाविद्यालयानजीकच्या म्हाडा वसाहतीतील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात २४ नोव्हेंबरला अळ्या आढळून आल्या.

चला आपण सगळे ‘हिंदु मूलतत्त्ववादी’ होऊया !

मारिया वर्थ या मूळच्या जर्मनी येथील असून त्यांनी हॅम्बर्ग विश्‍वविद्यालयातून मानसशास्राचा अभ्यास केला आहे. पुढे ऑस्ट्रेलियाला जाण्याच्या नियोजनाने त्यांनी जर्मनी सोडले. मार्गात असलेल्या भारतात काही दिवसांसाठी भेट देण्याच्या हेतूने त्या भारतात उतरल्या.

पद्मावती चित्रपटाचे निर्माता असणार्‍या अंबानी यांच्या आस्थापनाच्या विरोधात आंदोलन का नाही ? – माकपचा प्रश्‍न

पद्मावती चित्रपटातील कलाकारांना विरोध होत असतांना चित्रपटाचे निर्माते असलेल्या अंबानी यांच्या आस्थपनाच्या विरोधात आंदोलन का केले जात नाही ? असा प्रश्‍न मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी केला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now