ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळू ! – करणी सेनेची धमकी

ब्रिटनच्या ‘द ब्रिटीश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन’ने (बीबीएफ्सीने) पद्मावती चित्रपटाला प्रदर्शनासाठी प्रमाणपत्र दिल्यानंतर करणी सेनेने ‘ब्रिटनमधील चित्रपटगृहे जाळू’, अशी धमकी दिली आहे.

राममंदिर रामजन्मभूमीवरच बनणार ! – सरसंघचालक

अयोध्येतील रामजन्मभूमीवरच राममंदिर बांधले जाईल. याठिकाणी आणण्यात आलेल्या शिळांच्या साहाय्याने राममंदिर उभारले जाईल. राममंदिरावर लवकरच भगवा ध्वज फडकतांना दिसेल आणि हा दिवस आता दूर नाही

(म्हणे) ‘राष्ट्रवादी शक्तींपासून देशाला वाचवणार्‍यांना मतदान करा !’ – चर्चच्या बिशपचे ख्रिस्त्यांना आवाहन

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत आता चर्चही सहभागी झाले आहे. गांधीनगर येथील चर्चचे बिशप थॉमस मॅक्वेन यांनी एक पत्र लिहून राष्ट्रवादी शक्तींपासून देशाला वाचवण्यासाठी मानवी मूल्ये जोपासणार्‍या उमेदवाराला मते द्या

उत्तरप्रदेशमध्ये हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी यांची प्रेमकथा असणार्‍या ‘गेम ऑफ अयोध्या’ चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सतर्कतेची चेतावणी !

हिंदु तरुण आणि मुसलमान तरुणी यांच्या प्रेमकथेवरील ‘गेम ऑफ अयोध्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी उत्तरप्रदेशमध्ये सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

हाफीज सईदची सुटका करणार्‍या पाकिस्तानला बिगर-नाटो मित्र देशातून वगळा ! – अमेरिकेतील तज्ञाची मागणी

मुंबईवरील आतंकवादी आक्रमणाला ९ वर्षे लोटली तरीही अद्याप या आक्रमणाचा सूत्रधार आणि बंदी घालण्यात आलेल्या जमात-ऊद-दवाचा प्रमुख हाफीज सईद याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दोन पुजार्‍यांच्या वादामुळे देवीला एक घंटा विलंबाने नैवेद्य

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २४ नोव्हेंबरला ताठे आणि गुरव या दोन पुजार्‍यांमध्ये भांडणे झाल्याने श्री रुक्मिणीदेवीला १ घंटा विलंबाने नैवेद्य दाखवण्यात आला.

गुरुग्राम (हरियाणा) येथे १५ दिवसांच्या उपचारानंतर मृत पावलेल्या मुलीच्या पालकांना फोर्टिस रुग्णालयाकडून १६ लाख रुपयांचे देयक

३० ऑगस्टला ७ वर्षांच्या एका मुलीला डेंग्यू झाल्याने येथील फोर्टिस रुग्णालयामध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते; मात्र १५ दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

सरसंघचालकांना बॉम्बस्फोट प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना मुख्यमंत्री आणि केंद्रीयमंत्री साहाय्य कसे करतात ?

भगव्या आतंकवादाच्या सूत्रावरून सरसंघचालकांना मालेगाव बॉम्बस्फोटात अडकवण्याचा प्रयत्न करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहाय्य कसे करतात

त्रिपुरा स्टेट रायफल्सचे कमांडंट तपन देबब्रह्मा यांचा भ्रष्टाचार उघड केल्याने पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांची हत्या ! – संपादक सुबलकुमार डे यांचा दावा

त्रिपुरातील स्यान्दन पत्रिका या बंगाली वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सुदीप दत्त भौमिक यांची येथील त्रिपुरा स्टेट रायफल्सच्या मुख्यालयामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

नागपूर येथे वीज थकबाकीदार नगरसेवकांवर ‘एस्एन्डीएल्’कडून कारवाई

एस्एन्डीएल्’कडून भाजपच्या आणि काँग्रेसच्या वीज थकबाकीदार आजी-माजी नगरसेवकांवर कारवाई चालू करण्यात आली असून घाबरलेल्या भाजपच्या थकबाकीदार नगरसेवकांनी वीज देयक भरणे चालू केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now