मध्यप्रदेशमध्ये ‘पद्मावती’ चित्रपट दाखवणार नाही ! – मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा

भारतात स्त्रीला नेहमीच पूजनीय मानले गेले आहे. ‘पद्मावती’ चित्रपटामध्ये पद्मावतीच्या इतिहासात छेडछाड करण्यात आली आहे.

‘पद्मावती’ चित्रपट कचर्‍यात फेकून दिला नाही, तर गुजरात निवडणुकीत राजपुतांची मते मिळणार नाहीत !

‘पद्मावती’ चित्रपट कचर्‍यात फेकून दिला नाही, तर गुजरात निवडणुकीत राजपुतांची मते मिळणार नाहीत, अशी चेतावणी राजपूत समाजाचे नेते सूरज पाल यांनी दिली.

महाराष्ट्रात मद्याची दुकाने, ‘बिअर बार’ यांना देवतांची नावे देण्यावर बंदी

महाराष्ट्रातील देशी दारूची दुकाने आणि ‘बिअर बार’ यांना देवता, महापुरुष आणि गडकिल्ले यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.

अन्यायाच्या विरोधात तरुणांना जागृत करणे, हाच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

अन्याय, शोषण आणि अत्याचार यांविरोधात तरुणांना जागृत करण्याचे कार्य हाती घेणे, हाच हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याचा प्रारंभ ठरणार आहे.

संजय साडविलकर यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यास समीर गायकवाड यांना कोल्हापुरात येण्याची अनुमती

संजय साडविलकर यांनी ‘क्रिमीनल प्रोसिजर कोड १६४’ नुसार न्यायाधिशांसमोर ‘वर्ष १९८५ ते १९८८ या कालावधीत माझ्याकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने गावठी पिस्तुले खरेदी करणे, विक्री करणे, याची दुरुस्ती करणे आणि तयार करणे, हा व्यवसाय करत होतो’, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

(म्हणे) ‘बाबरी मशिदीच्या जागेवर राममंदिर बांधल्यास कोणताही मुसलमान सहन करणार नाही !’ – शिया पर्सनल लॉ बोर्ड

अयोध्येत राममंदिर बनवण्यावर कोणत्याही मुसलमानाचा आक्षेप नाही; मात्र बाबरी मशिदीच्या जागेवर राममंदिर बांधले, तर कोणताही मुसलमान ते सहन करणार नाही, अशी धमकी शिया पर्सनल लॉ बोर्डाचे संस्थापक आणि सरचिटणीस मौलाना सैय्यद अली हुसेन रिझवी कुम्मी यांनी दिली आहे.

वर्ष २०१८ मध्ये पृथ्वीवर २० विनाशकारी भूकंप होणार ! – अमेरिकेतील भूवैज्ञानिक

पृथ्वीचा परिभ्रमणाचा वेग मंदावत आहे. जेव्हा पृथ्वीच्या परिभ्रमणाचा वेग मंदावतो, तेव्हा भूकंप होतो. त्यामुळे वर्ष २०१८ मध्ये पृथ्वीवर न्यूनतमन्यून २० विनाशकारी भूकंप येण्याची शक्यता आहे.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या ९० व्या वाढदिवसाचा ‘न भूतो न भविष्यति’ असा झालेला अद्वितीय भावसोहळा !

आत्मप्रगती प्रदर्शित करणारा दिवस म्हणजे ‘आत्मगौरव दिवस’ ! – परात्पर गुरु पांडे महाराज ‘वाढदिवस म्हणजे शरिराची वाढ झाली, तो दिवस’, असे आपण म्हणतो; पण लयाकडे जाणार्‍या दिवसांत आपण किती आत्मप्रगती केली, हे प्रदर्शित करणारा दिवस म्हणजे वाढदिवस ! म्हणूनच यालाच ‘आत्मगौरव दिवस’ असे म्हणतात. आपला लय (मृत्यू) कधी होणार, हे ठाऊक नसल्याने आतापर्यंत आपण किती … Read more

‘सनातन पंचांग २०१८’ च्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन’चे अनावरण आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथाच्या मराठी भाषेतील विदर्भ-मराठवाडा आवृत्तीचे प्रकाशन

हिंदु धर्मजागृती सभेत ‘सनातन पंचांग २०१८’च्या ‘अ‍ॅण्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन’चे अनावरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे माजी सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांच्या हस्ते करण्यात आले.

निर्णय स्तुत्य; परंतु…!

देशी दारूची दुकाने आणि बिअर बार यांना देवता, महापुरुष आणि गडकिल्ले यांची नावे देता येणार नाहीत, असा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या संदर्भात लवकरच अधिसूचनाही जारी करण्यात येणार आहे. विलंबाने का असेना; पण एक स्तुत्य निर्णय घेतल्याविषयी भाजप-सेना युती शासनाचे अभिनंदन !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now