सरदार पटेल यांनी केलेल्या सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारावर नेहरू का नाराज होते ?

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिराच्या दर्शनावर पंतप्रधान मोदी यांनी टीका केली. ते एका प्रचार सभेत म्हणाले की, आज संपूर्ण विश्‍वामध्ये सोमनाथ मंदिराची पताका फडकत आहे. आता काही जणांना सोमनाथची आठवण येऊ लागली आहे; पण त्यांना विचारा की, त्यांना त्याचा इतिहास माहीत आहे का ?

कोपर्डी (जिल्हा नगर) येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना फाशी

जिल्ह्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे अन् संतोष भवाळ या तिघांना नगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी २९ नोव्हेंबरला फाशीची शिक्षा सुनावली.

स्मार्टफोनमधील चिनी अ‍ॅप काढून टाका !- हेरगिरीच्या संशयावरून सैन्याचा सैनिकांना आदेश

चीनकडून भारतीय सीमेवरील सैनिकांच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हेरगिरी होत असल्याची माहिती मिळाल्यावर सैन्य प्रशासनाने सैनिकांच्या भ्रमणभाषमधून वी चॅट, ट्रू कॉलर, विबो, यूसी ब्राउजर आणि यूसी न्यूज हे चिनी अ‍ॅप काढून टाकावेत आणि भ्रमणभाष ‘फॉरमॅट’ करावा, असा आदेश दिला आहे.

भाजपचे हरियाणातील पदाधिकारी सुरजपाल अम्मू यांचा पक्षत्याग

पद्मावती चित्रपटाला विरोध करणारे हरियाणातील भाजपचे राज्य माध्यम प्रमुख सुरजपाल अम्मू यांनी पदाचे आणि भाजपचे त्यागपत्र दिले आहे. अम्मू यांनी ‘पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या विशेषाधिकारामध्ये पद्मावती चित्रपटाला कचर्‍याच्या डब्यात टाकावे’, अशी मागणी केली होती.

मुंबईवरील २६/११ च्या आक्रमणानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने वायूदलाला सर्जिकल स्ट्राईक करू दिले नाही !

२६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर त्याचा सूड घेण्यासाठी वायूदलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना बनवली होती; मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारने ती फेटाळून लावली, असा गौप्यस्फोट माजी वायूदलप्रमुख फली होमी मेजर यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती केला.

पोलिसांवर आलेला खर्च राजन नारायण यांच्याकडून वसूल करा !

‘गोव्यातील इंग्रजी साप्ताहिक ‘गोवन ऑब्झर्व्हर’चे संपादक राजन नारायण यांनी १४ सप्टेंबर २०१७ ला त्यांच्या विरुद्धच्या दिवाणी दाव्यात फोंडा येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात उपस्थित रहातांना मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा संरक्षणासाठी आणून त्यांच्या जिवाला धोका असल्याचा बागुलबुवा उभा करण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला.

मी लष्कर-ए-तोयबाचा समर्थक ! – परवेझ मुशर्रफ

लष्कर-ए-तोयबाचा मी सर्वात मोठा समर्थक आहे आणि तोयबालाही मी आवडतो, असे विधान पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे.

हिंदुहित साधण्यासाठी संघटनाची आवश्यकता ! – विनायक पावसकर, अध्यक्ष, हिंदू एकता आंदोलन

अफझलखानवधाच्या चित्राचे निमित्त करून गणेशोत्सव आणि शिवजयंती यांच्या कार्यक्रमांमध्ये अडथळे आणले जात आहेत. व्यवस्थेकडून अनेक दशकांपासून हिंदूंचे दमन होत असूनही युवक अधिक जोमाने कार्य करत असल्याचे आश्‍वासक चित्र सध्या दिसत आहे.

तिहार कारागृहातील काश्मिरी मुसलमानांच्या कथित छळाविषयी चौकशीची मागणी – मेहबूबा मुफ्ती

देहली येथील तिहार कारागृहामध्ये अटकेत असणार्‍या काश्मिरी मुसलमानांवर अत्याचार केले जात आहेत, अशा माहितीवरून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी देशाचे गृह सचिव राजीव गाबा यांच्याशी दूरभाषवरून या प्रकारांची चौकशी करण्याची मागणी केली.