इसिसचा आतंकवादी हा काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या रुग्णालयात काम करत होता !

गुजरातमधून नुकतेच इसिसच्या दोन आतंकवाद्यांना अटक करण्यात आली होती. यातील एक ज्या रुग्णालयामध्ये काम करत होता, त्या रुग्णालयाचे काँग्रेसचे नेते आणि खासदार अहमद पटेल

बांगलादेश सरकार रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करणार

म्यानमारमधून स्थलांतरित झालेल्या रोहिंग्या मुसलमानांची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी बांगलादेश सरकारने आता रोहिंग्या मुसलमानांची नसबंदी करण्यात येणार आहे, असे म्हटले आहे.

राममंदिराच्या प्रश्‍नावर मध्यस्थ होण्यास मी सिद्ध आहे ! – श्री श्री रविशंकर

राममंदिराचा प्रश्‍न सोडवण्यास साहाय्य करण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. सर्व जण सकारात्मकतेने आले होते. त्यांना ही समस्या सुटावी, अशी अपेक्षा आहे.

केवळ अर्धा लिटर पाण्याद्वारेच उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करा ! – सर्वोच्च न्यायालय

हिंदूंच्या पवित्र १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर केवळ अर्धा लिटर आर्.ओ. पाण्याने (प्रक्रियेने शुद्ध केलेल्या पाण्याने) अभिषेक करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

छत्तीसगडमध्ये ३ माओवादी ठार

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर पोलीस आणि माओवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ माओवादी ठार झाले. छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यात कोपेनहडकाच्या जंगलात ही चकमक झाली.

महाराष्ट्रभरातून शिवप्रेमींनी केलेल्या विरोधामुळे दिग्दर्शक हेमंत देवधर आणि निर्माते सुनील भोसले यांच्याकडून क्षमायाचना !

झी मराठी वाहिनीवरील तुझं माझं ब्रेकअप मालिकेत किल्ल्यावर विकृत प्रसंग दाखवणारे दिग्दर्शक हेमंत देवधर आणि निर्माते सुनील भोसले यांनी अखेर हा प्रकार अनावधानाने घडला

रस्त्यांतील खड्ड्यांमुळे भारतात दिवसाला ६ जण जीव गमावतात !

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे देशात वर्ष २०१६ मध्ये एकूण २ सहस्र ४२४ जणांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे खड्ड्यांंमुळे दिवसाला किमान ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत हा कार्यक्रम होऊ देणार नाही. आम्हालाही हा कार्यक्रम नकोच आहे, असे सांगत महापौर श्री. नितीन काळजे यांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध दर्शवला आहे.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंग पूजेसंदर्भात धर्माचार्यांनी निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाकडून अपेक्षित ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

वर्ष १९९७ मध्ये उत्तरप्रदेश सरकारने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचे अधिग्रहण केल्यानंतर मंदिराच्या व्यावहारिक सूत्रांविषयी न्यायालय हस्तक्षेप करू शकते; मात्र पूजा-अर्चा यांमध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे स्पष्ट केले होते.

अस्वच्छतेमुळे बाणगंगा (वाळकेश्‍वर) तीर्थाचे पावित्र्य धोक्यात !

प्रभु श्रीरामांनी बाण मारून निर्माण केलेल्या वाळकेश्‍वर येथील प्रसिद्ध बाणगंगा या धार्मिक तिर्थाचे पावित्र्य अस्वच्छतेमुळे धोक्यात आले आहे.


Multi Language |Offline reading | PDF