छत्तीसगडच्या मंत्र्याकडे खंडणी मागणारे पत्रकार विनोद वर्मा यांना अटक

छत्तीसगड येथील भाजप नेते तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री राजेश कुमार यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून छत्तीसगड पोलिसांनी ज्येष्ठ पत्रकार विनोद वर्मा यांना २७ ऑक्टोबर या दिवशी सकाळी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली.

गुजरात निवडणुकीच्या कालावधीत आतंकवादी आक्रमणाची शक्यता

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय.एस.आय. राज्यात मोठे आतंकवादी आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे, त्यासाठी गुजरातमध्ये समुद्रमार्गे शस्त्रास्त्रे पाठवण्यात येणार असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली. यानंतर गुजरातची सागरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये आतंकवाद्यास अटक

नोएडाचे आतंकवादविरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा आणि मुगलपुरा पोलीस यांनी मुरादाबादहून लष्कर-ए-तोयबा या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी फरहान अहमद अली यास २६ ऑक्टोबरला रात्री उशिरा अटक केली.

महाराष्ट्र सरकारने कर्ज घेण्याची सर्वोच्च पातळी गाठली ! – वित्त विभाग

राज्याची आर्थिक स्थिती पूर्णतः कोलमडण्याच्या स्थितीत आली आहे. भाजप शासन सत्तेत आले, त्या वेळी राज्यावर २ लाख ६९ सहस्र ३५५ कोटी रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज २०१७-१८ या आर्थिक वर्षात ४ लाख १३ सहस्र ४४ कोटी रुपये झाले आहे.

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी धर्माला पुढे करणे दुर्दैवी ! – उपराष्ट्रपती

भारतात लोकसंख्यावाढीवर नियंत्रण आणण्याविषयी कोणाचेच लक्ष नाही. राजकीय पक्षही या प्रश्‍नावर बोलण्यास घाबरत आहेत. त्यांना वाटते की, जनता काय विचार करील ? काही लोक या सूत्रावर धर्माला पुढे करतात हेही दुर्दैवी आहे.

पद्मावती चित्रपट हिंदुत्वनिष्ठांना दाखवल्याशिवाय राज्यात प्रदर्शित होणार नाही ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्‍वासन

राज्यातील शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ नये; म्हणून पद्मावती चित्रपट हिंदुत्वनिष्ठांना दाखवल्याशिवाय राज्यात प्रदर्शित होणार नाही, असे आश्‍वासन गृहराज्यमंत्री श्री. रणजीत पाटील यांनी राजपूत महामोर्चा या संघटनेला दिले.

मर्सल चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करा !

मर्सल या तमिळी चित्रपटातील एका दृश्यात अभिनेता धार्मिक स्थळी मंदिरात चप्पल घालून गेला असल्याचे दाखवण्यात आले आहे. या दृश्यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग झाले आहे. मर्सल चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करा, अशी मागणी कायद्याचे शिक्षण घेणार्‍या येथील काही विद्यार्थ्यांनी केली.

काश्मीरमध्ये हिंसक आंदोलन करणार्‍यांना ५ वर्षांचा कारावास होणार

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसक आंदोलन करून सार्वजनिक मालमत्तेचे हानी करणार्‍यांना ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी राज्याचे राज्यपाल एन.एन. वोहरा यांनी द जम्मू-काश्मीर पब्लिक प्रॉपर्टी (प्रिव्हेंशन ऑफ डॅमेज) (अमेडमेंट) ऑर्डिनन्स २०१७ हा अध्यादेश काढला असून तो लगेचच लागू होणार आहे.

मराठ्यांचा इतिहास कोट्यवधी कागदपत्रांद्वारे १० खंडांमध्ये उलगडणार !

मराठ्यांचा इतिहास ‘मोडी लिपी’तील कोट्यवधी कागदपत्रांतून लिखित स्वरूपात उपलब्ध झाला असून तो १० खंडांमध्ये उपलब्ध होणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF