टिपू सुलतान हुतात्मा होता, तर बाबर, औरंगजेब यांसारखे आक्रमक कोण होते ? – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राजांकडून ओरबाडून स्वतःकडे घेतलेले म्हैसूरचे राज्य सोडवण्यासाठी त्याने इंग्रजांशी युद्ध केले होते.

डॉ. झाकीर नाईक युवकांना आतंकवादासाठी चिथावणी देत होता ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेचा प्रमुख डॉ. झाकीर नाईक हा युवकांना भडकाऊ भाषणे देऊन आतंकवादासाठी चिथावणी देत होता, असा आरोप राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने केला आहे.

एन्आयएकडून सैय्यद सलाउद्दीनच्या घरावर छापा

हिजबुल मुजाहिदीन या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याच्या घरावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी छापा मारला.

सीमा ओलांडून पाकमध्ये गेलेले सैनिक चंंदू चव्हाण यांना भारतात ३ मासांची शिक्षा

भारताने पाकवर केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर चुकून भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेले भारतीय सैनिक चंदू चव्हाण यांना ३ मासांची शिक्षा ठोठावण्यात आली

पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद वारकरी संप्रदायाकडेच हवे ! – ह.भ.प. नरहरि महाराज चौधरी, सचिव, वारकरी महामंडळ, महाराष्ट्र शासन

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ८ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या बैठकीत पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्षपद शासनाकडे ठेवून नवीन कार्याध्यक्ष किंवा सहअध्यक्ष पदांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

‘इसिस’ मध्ये भारतियांची भरती करण्यात दक्षिण भारतातील डॉक्टरचा हात

‘इसिस’ या आतंकवादी संघटनेने प्रसारित केलेल्या एका ध्वनीचित्रफितीमध्ये दक्षिण भारतातील एक डॉक्टर हा भारतियांची ‘इसिस’मध्ये भरती करत असल्याचे उघड झाले आहे.

पुणे येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ३० टन गोमांस कह्यात, एकाला अटक

हडपसर परिसरात विदेशात निर्यातीसाठी जाणारे ३० टन गोमांस गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी २५ ऑक्टोबरला जप्त (शासनाधीन) केले.

इसिसमध्ये भरती झालेला कल्याणचा फहाद शेख सिरीयात ठार

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती होण्यासाठी मे २०१४ मध्ये कल्याणमधील ३ मित्रांसमवेत घरातून पळून गेलेला २४ वर्षीय फहाद शेख ठार झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न : इंदूर येथे रेल्वेमध्ये २ जणांना अटक

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने ८ अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली येथे रेल्वे पोलिसांनी २ जणांना अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF