पाकमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे सहन करणार नाही ! – अमेरिका

पाकमध्ये आतंकवाद्यांचे अड्डे सहन करणार नाही, अशी चेतावणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांनी पाकला दिली. रेक्स टिलरसन हे सध्या ३ दिवसांच्या भारत दौर्‍यावर आले आहेत. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टिलरसन यांनी पाकला वरील चेतावणी दिली.

(म्हणे) ‘टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधातील युद्धात हुतात्मा होणारा योद्धा !’ – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात युद्ध करता करता हुतात्मा होणारा योद्धा होता. त्याने म्हैसुरू रॉकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि युद्धात त्याचा उत्तमप्रकारे उपयोग केला, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेला संबोधित करतांना काढले.

मुंबईत एटीएसच्या मुख्यालयावर धर्मांधांकडून सुतळीबॉम्बने आक्रमण

आतंकवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) नागपाडा येथील मुख्यालयावर धर्मांधांनी २१ ऑक्टोबरला पहाटे सुतळीबॉम्बने आक्रमण केले. काही हुल्लडबाज धर्मांधांनी हे कृत्य केल्याचे लक्षात आल्यावर नागपाडा पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करून दोघांना अटक केली.

इसिसशी संबंधित ३ संशयित धर्मांधांना केरळमधून अटक

इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरून ३ धर्मांधांना केरळ पोलिसांनी अटक केली. कन्नूर भागात २५ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली. हे तिघेही तुर्कस्तानातून भारतात परतल्याचे समोर आले आहे. ते मूळचे केरळमधील वेलापट्टणम् आणि चक्करकल येथील रहिवासी आहेत.

उज्जैनच्या महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावरील अभिषेकाच्या संदर्भात २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार

उज्जैन (इंदूर) येथील महाकालेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर पंचामृत यांच्याद्वारे केला जाणारा अभिषक होऊ द्यायचा किंवा नाही, अथवा किती प्रमाणात करायचा या सदंर्भात सर्वोच्च न्यायालय २७ ऑक्टोबरला निकाल देणार आहे.

(म्हणे) ‘अटकेतील फुटीरतावाद्यांशीही चर्चा होऊ शकते !’ – जम्मू-काश्मीरचे भाजपचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

जिहादी आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्यावरून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) अटक करण्यात आलेल्या फुटीरतावाद्यांशीही चर्चा करता येऊ शकते; कारण असे सर्वत्र होत असते, असे विधान जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते निर्मल सिंह यांनी केले आहे.

उच्च पदावरील पोलीस अधिकार्‍याला भ्रष्टाचारात सवलत ?

‘गोवा राज्यातील लाचखोरीची तक्रार पुराव्यासहित केली असतांना तत्कालीन पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांच्या विरोधात गुन्हा का नोंदवण्यात आला नाही ? असा प्रश्‍न तक्रारदार मुन्नालाल हलवाई यांनी उपस्थित केला आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये आता राजकीय आणि वारकरी मिळून २ अध्यक्ष नेमणार

२४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीमध्ये सहअध्यक्षपदाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता १ राजकीय अध्यक्ष, तर १ वारकरी संप्रदायाचा अध्यक्ष, असे २ अध्यक्ष असणार आहेत.

वाहनतळासाठी ताजमहालच्या आजूबाजूला असणार्‍या इमारती पाडा ! – सर्वोच्च न्यायालय

यासाठी ११ झाडे तोडण्याची उत्तरप्रदेश सरकारने मागितलेली मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

मध्यप्रदेशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा अधिक चांगले ! – भाजपचे मध्यप्रदेशमधील मुख्यमंत्री शिवराज चौहान

वॉशिंग्टनमध्ये विमानतळावर उतरलो आणि रस्त्याने येथे आलो. त्या वेळी मध्यप्रदेशातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले आहेत, असे लक्षात आले.


Multi Language |Offline reading | PDF