सैनिक हेच माझे कुटुंब ! – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवर जाऊन सैनिकांसमवेत दिवाळी साजरी केली. यंदाची दिवाळी नियंत्रण रेषेजवळ असणार्‍या गुरेज खोर्‍यात साजरी करण्यात आली.

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी

सुरक्षेच्या कारणास्तव कॅनडातील क्युबेक प्रांतात सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती क्युबेक प्रांताचे अधिकारी फिलिपी कौइलार्ड यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

सुषमा स्वराज यांची दिवाळीनिमित्त (भारताच्या नव्हे) पाकच्या नागरिकांना भेट !

दिवाळीनिमित्त परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारतीय नागरिकांना भेट देण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही; मात्र त्यांनी ट्वीट करून म्हटले की, दीपावलीच्या शुभमुहुर्तावर भारतमध्ये आजारावर उपचार घेण्यासाठी येऊ इच्छिणार्‍या सर्वांना व्हिसा दिला जाईल.

मुसलमान महिलांनी फेसबूकवर छायाचित्र अपलोड करणे इस्लामविरोधी ! – दारुल उलूम

देवबंद येथील इस्लामी शिक्षण संस्था दारुल उलूमच्या फतवा विभागाला विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना मुफ्तींच्या खंडपिठाने सामाजिक माध्यमांमध्ये मुसलमान महिलांनी स्वतःचे छायाचित्र अपलोड करणे इस्लामविरोधी आहे, असा फतवा काढला आहे.

शासकीय सेवेतील मागासवर्गियांना तात्पुरत्या बढत्या देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पदोन्नतीतील आरक्षण चालू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने १८ ऑक्टोबर या दिवशी तशा सूचना सर्व प्रशासकीय विभागांना दिल्या आहेत.

धर्मांधप्रेमी पोलीस !

बेंगळुरू (कर्नाटक) शहराच्या जवळ असणार्‍या तलघट्टापुरा येथे धर्मांध गोमाफियांकडून करण्यात येणारी गोहत्या रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या नंदिनी या महिला अभियंत्यावर धर्मांधांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

खाजगी क्षेत्रात आरक्षण नको ! – नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार

खाजगी क्षेत्रात रोजगारासाठी आरक्षण नको, असे स्पष्ट मत केंद्र सरकारच्या नीती (नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले आहे.

एस्.टी. कर्मचार्‍यांचा संप बेकायदेशीर ! – उच्च न्यायालय

एस्.टी. कामगारांचा संप बेकायदेशीर आहे. एस्.टी. ही अत्यावश्यक सेवा आहे. कर्मचार्‍यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावे अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

शहरी भागातील नागरिकांचा खर्च ग्रामीण भागातील नागरिकांपेक्षा ८४ टक्के अधिक

शहरी भागातील दरडोई खर्चाची रक्कम प्रतिमास २ सहस्र ६३० इतकी आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत हे प्रमाण ८४ टक्क्यांनी अधिक आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रति मासाचा दरडोई खर्च १ सहस्र ४३० इतका आहे.


Multi Language |Offline reading | PDF