(म्हणे) शेजारी देशांशी असलेला वाद चर्चेने सोडवणार ! – चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शेजारी देशांशी असलेला वाद चर्चेद्वारे सोडवण्याचे आश्‍वासन दिले आहे; मात्र देशाच्या सामरिक हितांच्या मूल्यावर असे केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एस्.टी.चा संप तिसर्‍या दिवशीही चालू !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) कर्मचार्‍यांनी चालू केलेल्या राज्यव्यापी संपावर कोणताही तोडगा न निघाल्याने सलग तिसर्‍या दिवशीही लाखो प्रवाशांना संपाची झळ बसली आहे.

मुंबईतील अनेक भागांत फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होऊन हवेची गुणवत्ता खालावली !

येथील अनेक विभागांमध्ये अभ्यंगस्नानाच्या वेळी, म्हणजेच १८ ऑक्टोबरला पहाटे फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ होऊन हवेची गुणवत्ता खालावली होती.

२ जहाल माओवाद्यांसह ६ समर्थकांना अटक

गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवडाभरात २ जहाल माओवाद्यांसह त्यांच्या ६ समर्थकांना अटक केली आहे. त्याच वेळी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कंपनी १० मध्ये कार्यरत एका माओवाद्याने आत्मसमर्पण केले.

घातक चिनी फटाक्यांची मेक इन इंडियाचे बनावट लेबल लावून विक्री

प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढवणार्‍या चिनी फटाक्यांवर वर्ष १९९२ पासून बंदी घालण्यात आलेली आहे. तरीही प्रतीवर्षी छुप्या मार्गाने दीड सहस्र कोटी रुपयांचे फटाके येथील बाजारपेठेत विकले जातात.

बिहारमध्ये १५ दिवसांत सरकारी बंगले रिकामी करण्याच्या सरकारच्या आदेशाला स्थगिती

बिहारमध्ये माजी मंत्र्यांकडून सरकारी बंगले रिकामी करण्यात न आल्याने सरकारने पुढील १५ दिवसांत ते रिकामी न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे. त्यांना बळजोरीने बंगल्यातून हाकलण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर आता झारखंड सरकारची बंदी घालण्याची सिद्धता

केंद्र सरकारचे गृहमंत्रालय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफ्आय) या जिहादी संघटनेवर बंदी घालण्याची सिद्धता करत असतांना आता झारंखड येथील सरकारही तसा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.

ओडिशामध्ये फटाक्यांच्या स्फोटांत ८ ठार

दिवाळीच्या तोंडावर ओडिशात बुधवारी ३ ठिकाणी फटाक्यांचे स्फोट होऊन लागलेल्या आगींमध्ये एकूण ८ जण ठार झाले, तर ८ जणांचे डोळे गेले. यासह अनेक जण गंभीररित्या घायाळ झाले.

हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेल्या फटाक्यांची ऑनलाईन विक्री होत असतांना त्याविषयी धर्मप्रेमींना तक्रार का करावी लागते ? पोलिसांना ते का दिसत नाही ?

हिंदूंच्या देवतांची चित्रे असलेले फटाके संकेतस्थळावर ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्याचे लक्षात येताच मुंबईतील प्रभादेवी येथील धर्मप्रेमी श्री. संदेश पवार आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद मानकर यांनी ९.१०.२०१७  या दिवशी दादर पोलीस ठाण्यात धर्मभावना दुखावल्याचा तक्रार अर्ज दिला.

ममता बनर्जी यांना ठार मारण्यासाठी ६५ लाख रुपयांची सुपारी !

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची हत्या करण्यासाठी एक लाख डॉलर (६५ लाख रुपये) मिळतील, अशा प्रकारचा एक संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर १९ वर्षांच्या विद्यार्थ्याला आला होता. ज्या क्रमांकावरून हा संदेश आला होता, तो क्रमांक अमेरिकेतील फ्लोरिडा शहरातील आहे.