उत्तरप्रदेशमध्ये २ सहस्र ६३२ मदरशांची मान्यता रहित होण्याची शक्यता

मदरशांमधील गैरव्यवहार आणि बोगस कारभार यांवर आळा घालण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील २ सहस्र ६३२ मदरशांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

लुधियाना येथे संघ स्वयंसेवकाची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक रवींद्र गोसाई (वय ६० वर्षे) यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. लुधियानामधील कैलाशनगर येथे ही घटना घडली.

धर्मांतरामुळे चर्च आणि स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या भरल्या ! – झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास

धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केले.

चोरीच्या भूमीवर ताजमहाल उभारणी ! – डॉ. स्वामी

शाहजहान याने जयपूरच्या राजावर दबाव निर्माण करून ताजमहालसाठी भूमी घेतली होती. या बदल्यात त्याला ४० गावे देण्यात आली होती. त्यामुळे ही चोरीचीच भूमी आहे.

कचरा आणि प्रदूषण यांमुळे गंगोत्रीच्या प्रवाहाची दिशा पालटत आहे ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

समुद्रसपाटीपासून १३ सहस्र २०० फुटांवर असणार्‍या गंगोत्री येथील गोमुखातून निघणारा गंगानदीचा प्रवाह पालटत आहे, असे वैज्ञानिकांच्या परीक्षणातून समोर आले आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल

वेतनवाढीच्या मागणीवरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.च्या) कर्मचार्‍यांनी १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप आरंभ केला आहे.

देशात ५५ टक्के लोकांना हवी आहे लष्करी राजवट ! – ‘प्यू रिसर्च सेंटर’च्या अहवालातील माहिती

देशातील ५५ टक्के लोकांनी ‘देशात लष्करी राजवट असायला हवी’, असे सांगितले आहे, अशी माहिती ‘प्यू रिसर्च सेंटर’ने त्यांच्या सर्वेक्षण अहवालात दिली आहे.

डोकलाममुळे चीनने भारताची ४९२ कि.मी. लांबीची अतीजलद रेल्वे योजना रोखली

भारताच्या चेन्नई, बेंगळुरू-म्हैसुरू या मार्गावर ४९२ कि.मी. अतीजलद रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट चीनच्या चायना रेल्वेे रेयुआन इंजिनियरिंग ग्रुप या आस्थापनाला देण्यात आले आहे.

(म्हणे) ‘कन्हैय्या कुमारने आझादीवर प्रश्‍न उपस्थित केले, तुम्हीही धाडसी बना !’

अलीकडच्या काळात जेएन्यूमधील विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने आझादीवर (स्वातंत्र्यावर) प्रश्‍न उपस्थित केले. विसरू नका तुम्हीही त्याच वयोगटातील आहात. तुम्हीही धाडसी बना, स्वामी विवेकानंदांनी तरुण वयात बंड केले