बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना सक्तीच्या रजेवर पाठवले

बांगलादेशचे हिंदु सरन्यायाधीश सुरेंद्र सिन्हा यांना नुकतेच सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएन्पी) या बांगलादेशमधील मुख्य विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

(म्हणे) ‘चीनने भारताची शक्ती ओळखल्याने त्याच्याशी आता कोणताही वाद नाही !’ – राजनाथ सिंह

भारत आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, तर तो अत्यंत शक्तीशाली झाला आहे. चीनने भारताच्या शक्तीला ओळखल्याने त्याच्याशी असणारा वाद सुटला आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

अंधेरीतील ‘रामभवन’ हे डान्सबारचे नाव न पालटल्यास वीर सेना बार बंद पाडेल ! – निरंजन पाल, अध्यक्ष, वीर सेना

डान्स बार आणि उपाहारगृह यांना देवतांचे नाव देण्याच्या विरोधात वीर सेनेने तीव्र भूमिका घेतली आहे. अंधेरी (पूर्व) येथील ‘रामभवन’ हे डान्स बारचे नाव एका आठवड्याच्या आत न पालटल्यास वीर सेना हा डान्स बार बंद पाडेल

गडचिरोली येथे पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त

येथील कोरची तालुक्यातील टीपागड परिसरात केलेल्या कारवाईत  नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात कमांडो पथकाला यश आले आहे. या वेळी झालेल्या चकमकीत महिला नक्षलवादी ठार झाली.

‘इंडियन एक्सप्रेस’वर कायदेशीर कारवाई करण्याविषयीच्या सनातन संस्थेच्या ट्विटला समाजातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद

गौरी लंकेश हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाचे (एस्.आय.टी.चे) अधिकारी बी.के. सिंह यांनी बंगळुरू येथे १४ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेतली.

नरकासुर प्रतिमादहन प्रथा बंद होणे आवश्यक ! – सुदिन ढवळीकर, सार्वजनिक बांधकाममंत्री

नरकासुर प्रतिमादहन प्रथेमुळे परंपरा आणि इतिहास यांची विसर पडत आहे. युवा पिढी नरकासुर प्रतिमा बनवण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील बहुमूल्य वेळ वाया घालवून स्वत:चीच हानी करून घेत आहे. नरकासुर प्रतिमादहन प्रथा बंद होणे आवश्यक आहे

कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या हिंदुविरोधी धोरणाचा हिंदु जागरण वेदिके आणि विहिंप यांच्याकडून निषेध

कर्नाटक सरकारच्या हिंदुविरोधी धोरणाच्या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि विश्‍व हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राजथाद्री मणिपाल येथे जिल्हाधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर नुकतीच निदर्शने केली.

मूर्तीचोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करा !

राज्यातील मूर्ती चोरी प्रकरणांचा छडा लावण्यासाठी हिंदु धार्मिक आणि धर्मादाय संस्था आयुक्त, पोलीस महानिरीक्षक ए.जी. पॉन मानिकवेल, भारतीय पुरातत्व खात्याचे प्रतिनिधी अन् राज्य पुरातत्व खात्याचे अधिकारी यांनी संयुक्त बैठक आयोजित करावी