परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कोणी काही करण्याची आवश्यकता नाही; कारण कालमहात्म्यानुसार ते होणारच आहे; पण या कार्यात जे तन-मन-धनाचा त्याग करून सहभागी होतील, त्यांची साधना होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतील.’

कोणत्याही संघटनेच्या सहभागाविषयी कोणतीही माहिती नाही ! – विशेष अन्वेषण पथक

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेचे नाव केवळ माध्यमांकडूनच घेतले जात आहे. आमच्याकडे कोणत्याही संघटनेच्या (सनातन संस्थेच्या) सहभागाविषयी कोणतीही माहिती नाही

दिवाळीतील विविध दिवसांचे महत्त्व, इतिहास आणि अध्यात्मशास्त्र

धनत्रयोदशी : आश्‍विन कृष्ण पक्ष त्रयोदशीच्या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.

अयोध्येतील सात्त्विकता !

उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार अयोध्या येथे शरयू नदीच्या किनार्‍यावर प्रभु श्रीरामाची १०० मीटर उंचीची मूर्ती स्थापन करणार आहे. अयोध्या येथे श्री राममंदिर उभारण्याचे सूत्र चालू आहेच. मंदिर उभारणीचे सूत्र गती घेत नाही, हे वास्तव आहे.

आली दीपावली !

दीपावलीचा उत्सव जवळ आला आहे. देशातील आणि जगभरातील हिंदूंना त्यांच्यातील एकात्मतेच्या भावनेने जोडणारा हा उत्सव आहे. हिंदूंच्या बलवान संघटनाचे ते प्रतीक आहे. वर्षातून एकदा येणारा हा सण जगभरातील लोकांचे आणि राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेतो.

सण साजरे करण्यामागील उद्देश !

१. देवतांची कृपादृष्टी संपादन करणे २. धर्मासाठी आणि समाजासाठी ज्यांनी जीवन वेचले, अशा संतमाहात्म्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेले ज्ञान यांचे सतत स्मरण ठेवणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले १०.९.२०१७ पासून अनुभवत असलेली कार्यपूर्तीची, म्हणजेच जीवन सार्थक झाल्याची स्थिती !

‘गेली १० वर्षे मी आजारपणामुळे कुठेही बाहेर जाऊ शकत नसलो, तरी कार्याला अध्यात्माचा आणि साधनेचा पाया असल्यास कार्य कसे आपोआप सर्वव्यापी होते, याची अनुभूती घेत आहे. ही अनुभूती दिल्याबद्दल ईश्‍वरचरणी अनंत कोटी कृतज्ञता !’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘संत रहीम यांनी सांगितले आहे, ‘एकै साधे सब सधै ।’, म्हणजे ‘एक गोष्ट साध्य झाली की, सर्व … Read more

काश्मीरमध्ये ३ आतंकवादी ठार

पुलवामा जिल्ह्यातील लिटर गावात १४ ऑक्टोबरला पहाटे सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे आतंकवादी वसीम उपाख्य ‘ओसामा’, वसीम शाह आणि हाफीज निसार हे ठार झाले आहेत

‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना पोलिसांकडूनच धमकी

बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदु कुटुंबांवर होणार्‍या अत्याचाराला सतत वाचा फोडणारे ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना चित्तगाँग शहर पोलीस आयुक्त महंमद इक्बाल बाहर यांनी धमकी दिली.

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दुहेरी खून खटल्याच्या प्रकरणी १० आरोपींना शिक्षा

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर दरोडा आणि दोन खुनांच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयातील मोक्का न्यायालयात १३ ऑक्टोबर या दिवशी सुनावणी पूर्ण झाली.


Multi Language |Offline reading | PDF