(म्हणे) ‘भारत शक्तीशाली झाल्यामुळेच डोकलाम वाद थांबला !’ – राजनाथ सिंह

भारत जगातील एक शक्तीशाली देश बनला आहे. भारत जर पहिल्यासारखा शक्तीहीन राहिला असता, तर चीनसमवेतचा डोकलाम वाद कधीही थांबला नसता, असे मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे देहली-एनसीआर परिसरात फटाके विकण्यावर बंदी

वाढत्या प्रदूषणामुळे देहली आणि शेजारील एन्सीआर् या भागांत दिवाळीच्या दिवसांत फटाके विकण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ही बंदी १ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

अपघातात मृत्यू पावलेल्या सैनिकांचे मृतदेह पुठ्ठ्यात कोंबल्याचे उघड!

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ४ दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ७ सैनिक हुतात्मा झाले होते. या सैनिकांचे मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पुठ्ठ्यात कोंबल्याचा प्रकार समोर आला आहे.

११ दोषींची फाशी जन्मठेपेत परावर्तीत ! – गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय

वर्ष २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकावर साबरमती एक्सप्रेसच्या डब्याला आग लावून ५९ कारसेवकांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने ११ दोषींची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेत परावर्तीत केली आहे.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणामध्ये १ सैनिक हुतात्मा

येथे राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीवर ८ ऑक्टोबरला आतंकवादी आक्रमणामध्ये एक सैनिक हुतात्मा झाला. दुसरीकडे बारामुल्ला येथे सुरक्षा दलांनी जैश-ए-महंमदचा ऑपरेशन कमांडर अबू खालीद याला ठार केले.

(म्हणे) ‘देवीच्या मंदिरामध्ये १०० टक्के महिलांना पुजारी म्हणून नेमा !’

कोल्हापूर नव्हे, तर कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये १०० टक्के महिला पुजारी म्हणून नेमण्यात याव्यात, तसेच देवाच्या मंदिरांमध्ये सरासरी प्रमाणे ५० टक्के महिला पुजारी नेमण्यात याव्यात, गाभार्‍यात प्रवेश झाला

रोहिंग्या मुसलमानांच्या विरोधातील डिचोली येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ५०० हिंदूंची उपस्थिती

भारताच्या सुरक्षेला घातक असलेल्या रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश देऊ नये, आजवर भारतात आलेल्या रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर काढावे

साधकांनो, सनातनची अपकीर्ती करण्याच्या विरोधकांच्या अपप्रचारांविषयी सतर्क रहा !

‘जिज्ञासूंना आध्यात्मिक उन्नतीसाठी वैयक्तिक मार्गदर्शन करणे, तसेच हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करणे, यांसाठी सनातन संस्था गेली २५ हून अधिक वर्षे कार्यरत आहे.

अकार्यक्षम पोलीस !

‘चेंबूर, वाशीनाका (पश्‍चिम) येथील इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात अनधिकृतरित्या नमाजपठण केले जाते


Multi Language |Offline reading | PDF