परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

कुठे बालवाडीसारखे लौकिक शिक्षण, तर कुठे ईश्‍वरप्राप्ती करून देणारे आध्यात्मिक शिक्षण !

(म्हणे) पत्रकार गौरी लंकेश हत्येत सनातनच्या बेपत्ता साधकांचा हात !

महिला पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येत सनातन संस्थेच्या ५ बेपत्ता साधकांचा समावेश असू शकतो, असा संशय कर्नाटक विशेष तपास पथकाने व्यक्त केल्याचे वृत्त सर्वत्र प्रसारित झाले आहे.इंग्रजी वर्तमानपत्र द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर अन्य दैनिकांनी त्याच वृत्ताची आंधळेपणाने रि ओढल्याचे निदर्शनास आले आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये मोशी (जिल्हा पुणे) येथे होऊ घातलेल्या ‘सनबर्न’ला संत, हिदुत्वनिष्ठ, मान्यवर आणि ग्रामस्थ यांचा विरोध !

पाश्‍चात्त्य विकृतीला चालना देणारा, अमली पदार्थांचा मुक्त वापर असलेला आणि नियम धाब्यावर बसवून केला जाणारा सनबर्न फेस्टिव्हल यंदा मोशी येथे होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी केसनंद येथे ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी केलेला विरोध

(म्हणे) डोकलाम आमचा भाग !

डोकलाम पूर्वीपासून आमचा भाग राहिला आहे. तो आमच्या अधिकारक्षेत्रात येतो. येथे कोणताही वाद नाही. आमचे सीमा सुरक्षा दल नेहमीच येथे पहारा देत असते. सार्वभौमत्वाच्या सूत्रानुसार आमच्या भागाचे रक्षण करणे हा आमचा अधिकार आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

चेंबूर (मुंबई) येथे भररस्त्यात अवैधरित्या चालणारे नमाजपठण बंद पाडण्यास बजरंग सेनेने पोलिसांना भाग पाडले

चेंबूर, वाशीनाका (पश्‍चिम) येथील इस्लामपुरा आणि फारूखगल्ली या ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांकडून भर रस्त्यात दुपारी १.३० वाजता रस्ता बंद करून पोलीस संरक्षणात अनधिकृतरित्या नमाजपठण केले जाते. या नमाजासाठी मार्ग बंद ठेवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.

रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे ! – बांगलादेश

रोहिंग्या मुसलमान ही म्यानमारची समस्या आहे आणि त्यावरचे उत्तर म्यानमारनेच शोधले पाहिजे, असे विधान बांगलादेशचे परराष्ट्र सचिव शहीदुल हक यांनी केले. बांगलादेशात थांबणे हा रोहिंग्यांपुढचा पर्याय असू शकत नाही. रोहिंग्या मुसलमानांनी लवकरात लवकर त्यांच्या देशात निघून जावे, असेही हक यांनी म्हटले आहे.

सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे आणि रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांना नवदुर्गा पुरस्कार प्रदान

नवमीला विविध क्षेत्रांत विशेष कार्य करणार्‍या नऊ महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये भूलतज्ञ असलेल्या सनातन संस्थेच्या डॉ. ज्योती काळे आणि रणरागिणीच्या कु. क्रांती पेटकर यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सनबर्नच्या विरोधात आज मोशी (जिल्हा पुणे) येथे निषेध आंदोलन

सनबर्न फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी मोशी येथे होण्याची चिन्हे आहेत. कार्यक्रमाचे संभाव्य ठिकाण हे आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांच्या जवळ असून पाश्‍चात्त्य कुप्रथा असलेला हा फेस्टिव्हल होऊच नये, यासाठी ग्रामस्थ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या आहेत.

पूर्वअनुमती शिवाय मोर्चा काढल्याने भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांसह २५ हून अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या कह्यात !

मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध करणारे आणि हत्येचा तपास जलदगतीने करण्याची मागणी करणारे हस्तफलक हाती घेतले होते.

बेस्टच्या आवाक्याबाहेरच्या बसगाड्यांच्या खरेदीची चौकशी

बेस्टच्या ताफ्यातील बसगाड्यांचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे बेस्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असून त्याचा काही अंशी बेस्टच्या महसुलावरही परिणाम होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF