डोकलाममध्ये चीनकडून रस्तेबांधणी पुन्हा चालू !

जून मासात चीन आणि भारत या दोन देशांत भूतानच्या डोकलाम प्रदेशावरून वाद निर्माण झाला होता. चीनने येथे रस्तेबांधणी चालू केल्यावर भूतानच्या आवाहनानंतर भारताने चीनला विरोध करत हे बांधकाम थांबवले होते.

(म्हणे) ‘आयएस्आयचे आतंकवाद्यांशी संबंध असले, तरी समर्थन नाही !’ – पाक

पाकची गुप्तचर संस्था ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएस्आय)’चे आतंकवाद्यांशी संबंध आहेत; मात्र याचा अर्थ असा नाही की ती आतंकवादी संघटनांचे समर्थन करते, असे विधान पाक सैन्याकडून करण्यात आले आहे.

१० ऑक्टोबरला लक्षावधी वारकर्‍यांचा आझाद मैदानावर धडक मोर्चा

पंढरपूर देवस्थान समितीमध्ये वारकर्‍यांची नियुुक्ती करण्यात येईल, असे आश्‍वासन देऊनही शासनाने त्यावर कृती केली नाही. त्यामुळे १० ऑक्टोबर या दिवशी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे

केरळच्या त्रावणकोर देवस्वम मंदिरामध्ये आरक्षणांतर्गत मागासवर्गीय पुजार्‍यांची निवड

केरळमधील मंदिरांवर नियंत्रण असणार्‍या त्रावणकोर देवस्वम मंडळाने पहिल्यांदाच मंदिरातील पुजार्‍यांची निवड आरक्षणाच्या अंतर्गत केली आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये वायूदलाचे हेलिकॉप्टर कोसळून ७ सैनिक हुतात्मा

येथे ६ ऑक्टोबरला सकाळी भारतीय वायूदलाचे एम्आय १७ व्ही ५ हे हेलिकॉप्टर कोसळले. यात ७ सैनिकांचा मृत्यू झाला. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास करण्यात येत आहे.

पिंपरी महापालिकेत उड्डाणपुलापासून भाजी मंडईसाठीही सल्लागारांवर उधळपट्टी

महापालिकेच्या वतीने शहरात कोट्यवधी रुपयांचे विविध प्रकल्प राबवण्यात येतात. यासाठी महापालिकेतील अभियंत्यांना पुष्कळ     वेतन दिले जात असतांना उड्डाणपुलापासून ते भाजी मंडईच्या विस्तारासारख्या छोट्या-मोठ्या कामांसाठीही सल्लागार नेमण्यात येत आहेत.

जीएसटीमुळे भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल ! – जागतिक बँक

भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक आहे. जीएस्टी (वस्तू आणि सेवा कर) लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत.

चोपडा (जळगाव) येथील संत बालयोगीजी महाराज यांच्या हस्ते सनातन पंचांग – २०१८ चे अनावरण

सनातन संस्थेचे कार्य अतिशय दैदीप्यमान असून खर्‍या अर्थाने धर्म वाचवण्याचे कार्य सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत आहे. या संस्थेला माझे सदैव आशीर्वाद आहेत,

केरळमधील हिंदूंना संपवण्यासाठी कम्युनिस्ट, ख्रिस्ती आणि मुसलमान मोठ्या प्रमाणात कार्यरत

कासारगोड येथील अथिरा नावाच्या मुलीने तिच्या मुसलमान वर्गमित्र-मैत्रिणी यांच्या दबावाला बळी पडून धर्मांतर केल्यानंतर तिने परत हिंदु धर्मात ‘घरवापसी’ केली.

सावत्र वडिलांकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

सावत्र वडिलांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या आईने याविषयी खडसवताच त्यांनी तिला आणि तिच्या मोठ्या बहिणीला पट्ट्याने मारले.


Multi Language |Offline reading | PDF