‘सनबर्न’ला भारतातूनच हद्दपार करा ! – सामाजिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारा आणि अमली पदार्थांच्या सेवनाचा पूर्वेतिहास असलेला ‘सनबर्न फेस्टिव्हल’ पिंपरी चिंचवड भागातील मोशी गावात होणार आहे.

श्रीनगरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या तळावर आतंकवादी आक्रमण

येथील विमानतळाच्या जवळ असणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या तळावर ३ ऑक्टोबरला पहाटे साडेचारला आतंकवाद्यांनी आक्रमण केले. दलाच्या १८२ व्या तुकडीला त्यांनी लक्ष्य केले. यात एक सैनिक हुतात्मा झाला

(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आतंकवादी !’ – पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे.

मुख्यमंत्री विजयन् उत्तरदायी ! – अमित शहा

राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्याला मुख्यमंत्री विजयन् थेट उत्तरदायी आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

धौलपूर (राजस्थान) येथे डीजे वाजवल्यावरून धर्मांधांचे दुर्गा उत्सवावर आक्रमण

येथील गीसुक्खा गावामध्ये डिजे वाजवण्यावरून धर्मांधांनी दुर्गा उत्सवावर आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. यात २ महिलांसहित ६ जण घायाळ झाले.

विजय मल्ल्या यांना लंडनमध्ये अटक आणि सुटका

पसार उद्योगपती विजय मल्ल्या यांना ३ ऑक्टोबरला लंडनमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर काही वेळात त्यांना न्यायालयात उपस्थित करण्यात आल्यावर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

भाग्यनगरमध्ये मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

येथे २ ऑक्टोबरला सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यात ३ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ६७.६ मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला.

#InjusticeOnHindus हा ट्रेंड भारताच्या पहिल्या १० ट्विटर ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर  

आज हिंदूबहुल भारतात हिंदूंवर ठिकठिकाणी अन्याय होत असल्याचे दिसून येते. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत हिंदूंचे विविध सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

एकविरादेवी मंदिराच्या सोन्याच्या कळसाची चोरी

कार्ला गडावरील एकविरादेवीच्या मंदिरावरचा कळस २ ऑक्टोबरला मध्यरात्री चोरीला गेला. या कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला होता. एका भक्ताने हा सोन्याचा मुलामा असलेला कळस दिला होता

उशिरा जागे झालेले पोलीस !

‘डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्यानंतर डेरा सच्चा सौदाच्या सिरसा (हरियाणा) येथील डेर्‍यामधून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली.


Multi Language |Offline reading | PDF