बुलेट ट्रेन केवळ जगाला दाखवण्यासाठी !

बुलेट ट्रेनमध्ये कोणीच बसणार नाही. केवळ जगाला दाखवण्यासाठी बुलेट ट्रेन चालू करा, असे आपण तत्कालीन पंतप्रधानांना सांगितल्याचे धक्कादायक वक्तव्य मोदी यांनी केल्याचे एका चलचित्रातून स्पष्ट होत आहे.

मिझोराममध्ये ख्रिस्त्यांनी हिंदु देवतेची प्रतिमा आणि राष्ट्रध्वज जाळला

मिझोराममधील लुन्ग्लेई जिल्ह्यात २१ सप्टेंबर या दिवशी ख्रिस्ती धर्मातील एका निनावी पंथाच्या कार्यकर्त्यांनी हिंदु देवतेची प्रतिमा आणि राष्ट्रध्वज जाळल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे.

मुसलमानांनीही उपचारासाठी गोमूत्राचा वापर करावा ! – योगऋषी रामदेवबाबा

गोमूत्राचा वापर उपचारांसाठी करता येतो, असे कुराणमध्ये लिहिले आहे. त्यामुळे मुसलमानांनीसुद्धा उपचारासाठी गोमूत्राचा उपयोग करावा, असा समादेश (सल्ला) पतंजलीचे संस्थापक योगऋषी रामदेवबाबा यांनी दिला आहे.

महंत मोहनदास यांचा शोध न लागल्यास आंदोलन करणार ! – अखिल भारतीय आखाडा परिषद

गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेले महंत मोहनदास यांचा शोध लावण्यास उत्तराखंड सरकार अपयशी ठरत आहे. यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेने या विरोधात आंदोलन करण्याची चेतावणी दिली आहे.

विसर्जनाच्या मिरवणुकीत मद्यपी समाजकंटकांचा गोंधळ टाळण्यासाठी निवेदन द्यावे लागणारे पोलीस !

‘डिचोली (गोवा) पोलीस ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवातील श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या वेळी काही समाजकंटकांकडून मद्यप्राशन करून घातला जाणारा धिंगाणा यावर्षी बंद करावा.

पाकच्या सीमेवर भुयार आढळले

येथील अर्निया सेक्टरमध्ये सीमेजवळील शून्य रेषेवर पाकच्या बाजूकडून खणण्यात येत असलेले १४ फूट लांबीचे भुयार सीमा सुरक्षा दलाने उघडकीस आणले आहे.

पंजाबमध्ये ७ खलिस्तानवादी आतंकवाद्यांना अटक

पोलिसांनी खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ पिस्तुले, ३३ काडतुसे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मणीपूरमध्ये मृत ख्रिस्ती महिला वेगळ्या पंथातील असल्याने मृतदेहाचे दफन करण्यास नकार

मणीपूर राज्यातील उख्रुल जिल्ह्यात असलेल्या लीन्गांग्चींग गावातील एका आदिवासी महिलेचा ७ ऑगस्ट या दिवशी मृत्यू झाला.

हिंदु राष्ट्र व्हावे म्हणून शिवसेनेची युती ! – उद्धव ठाकरे

हिंदूंची मते फुटू नयेत म्हणून; हिंदु राष्ट्र व्हावे म्हणून भाजपशी युती झाली होती; मात्र आज काय झाले ते कळत नाही. रोहिंग्यांनी म्यानमारमध्ये २८ हिंदूंना कापून टाकले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF