हिंदूंचे हत्याकांड करणार्‍यांना कठोर शिक्षा द्या ! – भारताची म्यानमारकडे मागणी

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हिंदूंना ठार करून खड्ड्यात पुरल्याच्या प्रकरणी भारताने म्यानमारकडे चिंता व्यक्त करत आतंकवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

पुरातत्व विभाग महाकाल शिवलिंगाला दगड समजून परीक्षण करतोे ! – मंदिर व्यवस्थापन समितीचे पुजारी पं. आनंदशंकर व्यास

येथील महाकाल शिवलिंगाचे पुरातत्व विभागाच्या विशेषज्ञांकडून जे परीक्षण करण्यात आले, ते त्याला दगड समजून करण्यात आले आहे; मात्र आमच्या दृष्टीने म्हणजे सनातन हिंदु धर्मासाठी ते ज्योतिर्लिंग आहे.

२० सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या सणांच्या काळात दक्षिण-पूर्व रेल्वेच्या फलाट तिकिटांचे मूल्य दुप्पट !

एकीकडे हज यात्रेकरूंना अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे हिंदूंंच्या सणांच्या वेळी तिकिटांचे दर दुप्पट करायचे, अशी निधर्मीवादाच्या नावाखाली धार्मिक भेदभाव नीती आणखी किती दिवस चालणार, हे आता हिंदूंनी ठरवायला हवे !

अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला कर्नाटक मंत्रीमंडळाची संमती

कर्नाटक मंत्रीमंडळाने अंधश्रद्धाविरोधी विधेयकाला संमती दिली. त्यामुळे कर्नाटक काळी जादू आणि अमानवी अघोरी शक्ती प्रतिबंधक आणि निर्मूलन विधेयक, २०१७  हे विधेयक पुढील विधानसभा अधिवेशनात संमतीसाठी मांडण्यात येणार आहे.

(म्हणे) अल् कायदा, इसिस यांचा हेतू निष्फळ करण्यात भारतीय मुसलमानांची महत्त्वाची भूमिका ! – केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

अल् कायदा आणि इसिस यांसारख्या संघटना भारतात त्यांचे पाय पसरवण्यात अपयशी ठरल्या, यामागे भारतीय मुसलमानांची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यांकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केले.

रोहिंग्या मुसलमानांचे आतंकवाद्यांशी संबंध ! – योगी आदित्यनाथ

म्यानमारहून भारतात आलेले रोहिंग्या मुसलमान हे शरणार्थी नसून घुसखोर आहेत. त्यांचे आतंकवाद्यांशी संबंध आहेत. म्यानमारमधील अनेक निष्पाप हिंदूंची त्यांनी हत्या केली आहे.

लव्ह जिहाद असल्यावरून मेरठमध्ये न्यायालयात नोंदणी विवाह करणार्‍यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रोखले

मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांनी न्यायालयात जाऊन नोंदणी पद्धतीने विवाह करण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याची घटना नुकतीच येथे घडली.

हरियाणा येथे गोतस्करांचा पाठलाग करणार्‍या महिलांवर गोळीबार केला आणि जिवंत गाय फेकली

ब्रिटीश नागरिक असलेल्या सोनिया शर्मा आणि त्यांची मैत्रीण आर्ची बारानवाल यांच्यावर हरियाणातील सोहाणा रोड, गुरुग्राम येथे गोतस्करांनी आक्रमण केले. या वेळी गोतस्करांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

चीनच्या शिंजियांग प्रांतामधील मुसलमानांना कुराणासहित सर्व धार्मिक वस्तू शासनजमा करण्याचा आदेश

चिनी अधिकार्‍यांनी शिंजियांगच्या उत्तर-पश्‍चिम भागातील मुसलमानांच्या विरोधात त्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे.

अवैधरित्या होणारी गोवंश हत्या प्राणी कल्याण मंडळ शोधून काढते; पण पोलिसांना ते जमत नाही !

गोवा राज्यात गोमांसाचा तुटवडा भासू नये, यासाठी गोवा मांस प्रकल्पाने यंत्रणा उभारूनही कोलवा येथे १ सप्टेंबर २०१७ या रात्री गोवंशियांची अवैधपणे हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे.