अंघोळ करणार्‍या महिलेचे चित्रीकरण करणार्‍या पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद

शेजारी रहाणार्‍या महिलेचे आंघोळ करतांना चित्रीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी एका पोलीस कर्मचार्‍याला कह्यात घेतले आहे. या प्रकरणी एका ३० वर्षीय महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भाग्यनगर येथे अल्पवयीन मुलींची विक्री करणार्‍या आणखी चौघांना अटक

भारतातील अल्पवयीन मुलींची विक्री केल्याच्या प्रकरणी एक भारतीय काझी आणि ३ अरबी नागरिक यांना अटक करण्यात आली आहे. भाग्यनगर येथील पोलीस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांनी ही माहिती दिली.

देहली येथे संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने शालेय उपयोगी साहित्याचे विनामूल्य वाटप

संतकृपा प्रतिष्ठानच्या वतीने संगम विहार येथील ‘आस्था पब्लिक स्कूल’ या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले.

काश्मिरी हिंदूंना वाली नाही ! – सुशील पंडित

जिहादच्या नावाखाली जम्मू आणि काश्मीरमध्ये जे चाललेले आहे, त्याची राजकीय पक्षांनी वास्तव जाणीव ठेवली पाहिजे. निवडणुकांपूर्वीच्या घोषणापत्रात कलम ३७० आणि ३५ अ रहित करण्याचे सूत्र असूनही भाजपने आतापर्यंत त्याविषयी काहीच केले नाही.

(म्हणे) ‘मिरज दंगलीत संभाजीराव भिडेनी लोकांची डोकी भडकवली आणि पोलीस चौकी जाळली !’

मिरज दंगल ही घडवून आणली होती. दंगलीच्या क्लिप्स् इचलकरंजी येथे सिद्ध करण्यात आल्या. हे सर्व तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी उजेडात आणले.

जुळेवाडी (जिल्हा सांगली) येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच रायगडावर सुवर्ण सिंहासन बसवण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी चंडिकायज्ञ !

जुळेवाडी (तालुका तासगाव, जिल्हा सांगली) येथे सनातन संस्थेचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभण्यासाठी, तसेच रायगडावर सुवर्ण सिंहासन बसवण्याचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जुळेवाडी येथील श्रीलक्ष्मी मंदिर येथे चंडिकायज्ञ करण्यात आला.

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा देशात प्रथम !

‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याचे काम उल्लेखनीय झाले आहे. स्वच्छतेवर आधारित देण्यात आलेल्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा देशात प्रथम स्थानावर आला आहे.

तुळजापूर येथे भवानी तलवार अलंकार स्वरूपात महापूजा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीस अर्पण केलेले दागिने, गोल आकार असलेली छत्रपती शिवाजी महाराज असे नाव असलेली पुतळ्याची माळ, ज्यामध्ये हिरे, मोती, पांचू, रत्नजडीत अलंकार असलेले दागिने घालून येथील तुळजाभवानी देवीची २७ सप्टेंबरला महापूजा करण्यात आली.

भेसळ आणि अन्य त्रुटी असलेल्या पेट्रोलपंपाला जिल्हाधिकार्‍यांनी टाळे ठोकले !

सांगली-माधवनगर रस्त्यावर नवीन बायपास चौकात असणार्‍या मातोश्री पेट्रोल पंपावर जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी धाड टाकली. या वेळी पेट्रोल-डिझेल यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ, घनता आणि मापात अनेक त्रुटी असल्याचे उघड झाले. तपासणीनंतर पंपाला टाळे ठोकण्यात आले.


Multi Language |Offline reading | PDF