नवरात्रोत्सव (आज नववा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, दुसरे तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

नवादा (बिहार) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

येथील बलिया बुजुर्ग गावामध्ये धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना २७ सप्टेंबरला घडली. यामुळे येथे तणाव निर्माण झाला. येथे सप्तमीच्या दिवशी मूर्तीची स्थापना करण्यासाठी मिरवणुकीनेे ही मूर्ती आणली जात होती.

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांच्या विरोधातील बलात्काराचा आरोप निश्‍चित

तहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी सहकारी पत्रकार महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी गोव्यातील म्हापसा येथील सत्र न्यायालयाने आरोप निश्‍चित केले आहेत. या खटल्याची सुनावणी आता चालू होणार आहे. 

म्यानमारमधून अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या ३ रोहिंग्यांसह चौघांना बांगलादेशमध्ये अटक

बांगलादेशच्या पोलिसांनी अमली पदार्थांच्या गोळ्यांच्या तस्करीच्या प्रकरणी ३ रोहिंग्या मुसलमान आणि एक बांगलादेशी नागरिक यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ लाख याबा टॅब्लेटस् (मेथम्फेटामाइन) जप्त करण्यात आले आहेत.

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून घरात घुसून सैनिकाची हत्या

जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या बांदिपोरा जिल्ह्यातील हाजीन येथे रहाणारे सीमा सुरक्षा दलाचे सैनिक रमीझ अहमद पारे (वय ३० वर्षे) यांची त्याच्या घरात घुसून हत्या केली.

डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनाविषयी ५ ऑक्टोबरला निर्णय

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी २८ सप्टेंबरला झाली. या वेळी या प्रकरणातील संशयित आरोपी तथा सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनावर दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद झाला.

शिक्षणाची दयनीय स्थिती असणार्‍या जागतिक देशांच्या सूचीमध्ये भारत दुसर्‍या क्रमांकावर !

जागतिक बँकेकडून जगातील शिक्षणाची दयनीय स्थिती असणार्‍या १२ देशांच्या नावांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

आम्ही धर्मरक्षण करणार नाही आणि तुम्हाला करू देणार नाही, या वृत्तीचे पोलीस !

पुणे येथील थेरगाव घाटावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गौरीविसर्जनाच्या दिवशी म्हणजे ३१ ऑगस्टला नेहमीप्रमाणे प्रबोधन मोहीम राबवण्यात येत होती.

रोहिंग्यांच्या प्रश्‍नावरून बांगलादेशला राजनैतिक सहकार्य करण्याचे भारताचे आश्‍वासन

निर्वासित रोहिंग्या मुसलमानांच्या समस्येविषयी भारताने बांगलादेशाला राजनैतिक साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. येथे एका कार्यक्रमात बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त हर्षवर्धन श्रृंगला यांनी ही माहिती दिली.

फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ ग्रंथाचे प्रकाशन

एस्.एस्.आर्.एफ्.चा (स्पीरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशनचा) फ्रेंच भाषेतील ‘अहं-निर्मूलनासाठी साधना’ हा पहिला ग्रंथ एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधकांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. एस्.एस्.आर्.एफ्.चे संत पू. सिरियाक वाले यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले.


Multi Language |Offline reading | PDF