नवरात्रोत्सव (आज आठवा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 

म्यानमार सीमेवर भारतीय सैन्याची नागा आतंकवाद्यांवर कारवाई

भारतीय सैन्याने म्यानमार सीमेवर कारवाई करून नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालॅण्ड (खापलांग) या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. यात अनेक आतंकवादी ठार झाले आहेत

भारतीय सैन्याच्या आक्रमक ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने शेपूट घातले !

सीमेवर सातत्याने गोळीबार करून निरपराध भारतीय नागरिकांना ठार करणार्‍या पाक सैन्याच्या विरोधात भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने शरणागती पत्करत गोळीबार थांबवण्याची एकदा नाही, तर दोनदा विनंती केल्याचे समोर आले आहे.

संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ डिसेंबरमध्ये संतभूमी देहू आणि आळंदी यांच्या प्रवेशद्वारावर होणार

मागील वर्षी पुण्यातील केसनंद या गावात पर्यावरणाची हानी करणारा आणि अमली पदार्थांची रेलचेल असणारा संस्कृतीद्रोही ‘सनबर्न फेस्टिव्हल’ यंदाच्या वर्षी संतभूमीच्या प्रवेशद्वारावरच होणार आहे.

बौद्धांची कत्तल करणार्‍या रोहिंग्या मुसलमानांचा प्रकाश आंबेडकर यांना पुळका का ? – भाजपचे खासदार अमर साबळे यांचा प्रश्‍न

रोहिंग्यांनी बौद्धांची केलेली कत्तल आणि बौद्धांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या बोधगयात घडवलेला बॉम्बस्फोट यांमुळे आंबेडकर यांना अस्वस्थ का वाटले नाही ?,

हाफिज सईद, लष्कर-ए-तोयबा आमच्या डोक्यावरील बोजा ! – पाकचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांची स्वीकृती

पाकमधील काही लोक आमच्या डोक्यावरील बोजा झाले आहेत. हे लोक एकट्या पाकसाठीच नाही, तर संपूर्ण दक्षिण आशियासाठी डोकेदुखी ठरत आहेत. याविषयी कोणाच्याही मनात शंका नाही. मीदेखील यावर सहमत आहे

रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार्‍यांवर कारवाई करावी !

रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ डिचोली, वास्को आणि मडगाव अशा तीन ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी घातक प्रवृत्तीच्या रोहिंग्या मुसलमानांच्या समर्थनार्थ असे मोर्चे काढणे म्हणजे एक प्रकारे देशद्रोह आहे.

म्यानमारमधील निर्वासित हिंदूंना भारत हेच एकमेव आशास्थान !

म्यानमारमधील हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये निर्वासित म्हणून रहात असणार्‍या हिंदूंना आता तेथे रहाण्याविषयीची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे भारत त्यांना साहाय्य करील, अशा आशेवर ते आहेत

बायणा, वास्को येथील अवैध बांधकामाच्या विरोधातील कारवाईत पालिकेने ४० वर्षे जुनी दोन मंदिरे पाडली

दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशावरून मुरगाव नगरपालिकेने २६ सप्टेंबर या दिवशी बायणा, वास्को येथील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई करतांना तेथील श्री बसवेश्‍वर मंदिर आणि श्री लक्ष्मी मंदिर ही सुमारे ४० वर्षे जुनी मंदिरेही पाडली.


Multi Language |Offline reading | PDF