बांगलादेशमधील छावण्यांमधील हिंदूंचे रोहिंग्या मुसलमानांकडून धर्मांतर

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीकडून हिंदूंचा नरसंहार होत असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राखीन भागात २८ हिंदूंना ठार मारून खड्ड्यात गाडल्याचे समोर आले होते.

नवरात्रोत्सव (आज सातवा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात. 

मेजर रमेश उपाध्याय यांना ९ वर्षांनी जामीन संमत

वर्ष २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेले मेजर रमेश उपाध्याय यांना ९ वर्षांनंतर २६ सप्टेंबरला जामीन संमत करण्यात आला. उपाध्याय यांना जामीन देतानाच त्यांना देशाबाहेर जाण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे.

वादग्रस्त अभिनेत्री सनी लियोन आणि ‘मेनकाईन्ड’ आस्थापन यांच्या विरोधात बडोदा येथे हिंदु जनजागृती समितीकडून तक्रार प्रविष्ट

हिंदूंच्या पवित्र नवरात्री उत्सवाच्या काळात गुजरातमध्ये ‘नवरात्री खेळा परंतु प्रेमाने’ असे लिखाण असलेल्या आणि अभिनेत्री सनी लियोन यांचे छायाचित्र असलेल्या ‘मेनफोर्स कन्डोम’ या उत्पादनाचे मोठे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले.

बिहारमध्ये कारागृहातून ३४ कैद्यांचे पलायन !

मुंगेर जिल्ह्यातील एका कारागृहातून २४ सप्टेंबरला ३४ कैद्यांनी पलायन केले. यातील १२ नंतर परत आले, तर उर्वरितांचा पोलीस शोध घेत आहेत. या कारागृहात एकूण ८६ कैदी होते.

पाकच्या कारवाया चालूच राहिल्या, तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू ! – जनरल बिपीन रावत यांची चेतावणी

सीमेवर पाकच्या कारवाया चालूच राहिल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, अशी चेतावणी सैन्यदल प्रमुख बिपीन रावत यांनी पाकला दिली आहे.  गेल्या वर्षी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण होत आहे.

दाऊद इब्राहिम हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पुरवत होता !

दाऊद इब्राहिम आणि डॉ. झाकीर नाईक यांचे जवळचे संबंध आहेत. दाऊद वर्ष २०१२ पासूनच डॉ. झाकीर नाईक यांना आर्थिक साहाय्य करत होता. मुंबईतील काही उद्योगपतींच्या माध्यमातून दाऊद हा डॉ. झाकीर नाईक यांना पैसे पोचवत होता.

मुंबई पोलिसांकडून श्री गणेशाचे मानवीकरण करून विडंबन

‘मुंबई पोलिसांनी त्यांच्या ‘टि्वटर अकाऊंट’वर गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी केलेल्या ट्वीटमध्ये गणपतीची २ चित्रे दाखवली आहेत.

संयुक्त राष्ट्रांत भारताकडून लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र दाखवून पाकला प्रत्युत्तर

भारताच्या राजदूत पौलोमी त्रिपाठी यांनी काश्मीरमध्ये पाकपुरस्कृत जिहादी आतंकवाद्यांकडून हत्या करण्यात आलेले लेफ्टनंट उमर फयाझ यांचे छायाचित्र संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दाखवत पाकचा खोटारडेपणा उघड केला.

जगातील २० सर्वांत तणावग्रस्त शहरांमध्ये ४ भारतीय शहरे !

जगात सर्वाधिक तणावग्रस्त २० शहरांपैकी ४ भारतीय शहरे आहेत. यात नवी देहली जगात ९ व्या क्रमांकाचे तणावग्रस्त शहर ठरले आहे, तर मुंबई १३ व्या, कोलकाता १९ व्या आणि बेंगळुरू २० व्या क्रमांकावर आहे.


Multi Language |Offline reading | PDF