नाशिक येथे पुजार्‍यांच्या मालमत्तेवर आयकर विभागाचे लक्ष !

येथे अनेक पूजाविधी होतात. त्यातून पुजार्‍यांना आर्थिक लाभ होतो, या कारणानुसार आता आयकर विभागाने येथील पुजार्‍यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेवले आहे.

पाकिस्तानची अण्वस्त्रे जिहादी आतंकवाद्यांकडून चोरी होण्याची भीती

पाकची अण्वस्त्रे अपघातग्रस्त होण्याचा किंवा आतंकवाद्यांकडून चोरी होण्याचा धोका असल्याची माहिती फेडरेशन ऑफ अमेरिकन सायन्टिस्ट्स् (एफ्एएस्) या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.

नेताजींमुळेच खरे स्वातंत्र्य मिळाले, गांधींमुळे नव्हे ! – अनुज धर, संस्थापक, मिशन नेताजी

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी २ मासांत असे काय घडले, ज्याने एवढ्या लगेच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले ? आझाद हिंद सेनेमुळेच इंग्रज शासकांना भारतातून निघावे लागले. याचे सर्व श्रेय नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहे.

चीन आणि पाकिस्तान यांना रोखण्यासाठी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याची आवश्यकता ! – विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम

भारतियांसमोर अनेक आव्हाने असून चीन आणि पाकिस्तान यांना रोखण्यासाठी अंतर्गत सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्याची आवश्यकता आहे. देशातील जाती-धर्माच्या नावावरील हेवेदावे बाजूला सारून सामना करायला हवा, असे मत विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी मांडले.

काँग्रेसच्या निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच दोन गटांत हाणामारी

येथे काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठी आलेल्या निरीक्षकांपुढेच दोन गटांत हाणामारी झाली. पक्ष निरीक्षकांना ठरलेल्या ठिकाणाऐवजी दुसरीकडेच उपस्थित रहाण्यास सांगितल्याने माजी खासदार नरेश पुगलिया गटाने गोंधळ घातला.

कोलकातामध्ये १ रुपये तिकीट असणारी गोबर गॅसच्या साहाय्याने चालणारी बससेवा चालू !

येथे गोबर गॅसच्या साहाय्याने चालणारी बस चालू करण्यात आली आहे. १७.५ किमी अंतरासाठी केवळ एक रुपया तिकीट आकारण्यात येत आहे. देशातील ही सर्वात स्वस्त असणारी बस ठरली आहे.

कोल्हापूर येथे चौथ्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची अष्टभुजा महासरस्वती रूपातील पूजा !

शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची श्री अष्टभुजा महासरस्वती रूपात पूजा बांधली होती. ही पूजा सर्वश्री माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर, रवी माईनकर यांनी बांधली.

हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवू पहाणार्‍या ममता बॅनर्जी यांना धडा शिकवावा ! – विनोद शिंदे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्या धर्मभावना पायदळी तुडवू पहाणार्‍या आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणार्‍या ममता बॅनर्जी यांना आता हिंदूंनी धडा शिकवायला पाहिजे.

गौरी लंकेश प्रकरणी वाराणसी येथे विरोधी पक्षांकडून विनाअनुमती मोर्चा

येथे २० सप्टेंबर या दिवशी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणावरून शासनाच्या विरोधात समाजवादी पक्ष, काँग्रेस, आप, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अपना दल यांच्या वतीने संयुक्त मोर्चा काढण्यात आला.

गोमंतकियांच्या राष्ट्रीयत्वाचा र्‍हास झाल्याचे ठामपणे सांगणारे स्वातंत्र्यसेनानी डॉ. टी.बी. कुन्हा !

गोव्याच्या मुक्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसेनानी प्राणपणाने लढले.


Multi Language |Offline reading | PDF