रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड

रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांच्या आराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने राखिन प्रांतात २८ हिंदूंचे सामूहिक हत्याकांड घडवल्याची माहिती म्यानमारच्या सैन्याने दिली आहे. या हिंदूंना ठार करून त्यांचे मृतदेह मोठ्या खड्ड्यात गाडण्यात आले होते.

नवरात्रोत्सव (आज सहावा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

पाकमध्ये सहस्रावधी मदरशांमधून शेकडो आतंकवादी बनवले जातात ! – कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये सहस्रावधी मदरशांमधून ‘सौदी अरेबियाच्या इस्लामनीती’चे शेकडो आतंकवादी बनवले जात आहेत, असे विधान कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तानने (सीपीपीने) केले आहे.

श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्याची गोकाक (बेळगाव) येथे हत्या

बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरात श्रीराम सेनेचे कार्यकर्ते रोहितराजू पाटील (वय २६ वर्षे) यांची २४ सप्टेंबरच्या रात्री अज्ञातांकडून भोसकून हत्या करण्यात आली.

नगर येथे १५ गायींची कत्तल करणार्‍या ५ धर्मांधांना अटक

येथील पशूवधगृहांवर पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत १५ गायींची कत्तल करण्यात आल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी ५ धर्मांधांना अटक केली.

भ्रष्टाचाराचा आरोप असणारे तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय त्यागपत्र देऊन भाजपमध्ये जाणार

तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार मुकुल रॉय यांनी ते खासदारकीचे आणि पक्षाचे त्यागपत्र देणार असल्याचे घोषित केले आहे; मात्र त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीचे त्यागपत्र दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सौभाग्य’ योजनेचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीनदयाल ऊर्जा भवनाचे २५ सप्टेंबरला येथे लोकार्पण केले. या वेळी त्यांनी ‘सौभाग्य योजने’चे उद्घाटन करत प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा केली

अवैधरित्या हायड्रोजनयुक्त गॅस सिलिंडर वापरणार्‍या फुगेविक्रेत्यांकडे दुर्लक्ष करणारे पोलीस !

‘गॅसफुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील भांडुप परिसरात घडली. या स्फोटात फुगे विक्रेत्याचे २ सहकारीही घायाळ झाले.

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया ! – सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर, प्रसारसेविका, सनातन संस्था

आनंदी जीवनासाठी ‘साधना’ आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘ईश्‍वराचे अधिष्ठान’ असणे अत्यंत आवश्यक आहे. ‘गुरुकृपायोगानुसार साधना हा हिंदु राष्ट्र स्थापनेचा पाया आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी केले.


Multi Language |Offline reading | PDF