लेखक कांचा इलय्या यांना चपलांनी चोपले !

लेखक कांचा इलय्या यांच्या ‘सामाजिका स्मगलर्लु कोमाटोल्लू’ या तेलुगु पुस्तकामध्ये आर्य-वैश्य समुदायाच्या विरोधात विधाने करण्यात आल्याने त्यांचा तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये विरोध करण्यात येत आहे.

नवरात्रोत्सव (आज पाचवा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

पोलिसांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्याने हिंसाचार

बनारस हिंदु विद्यापिठामध्ये विद्यार्थिनींशी होणार्‍या छेडछाडीच्या विरोधात चालू असलेेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यावर लाठीमार केल्यामुळे २३ सप्टेंबरच्या रात्री विद्यापिठाच्या आवारात हिंसाचार झाला

संयुक्त राष्ट्रांमध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावले

भारत आणि पाकिस्तान एकत्र स्वतंत्र झाले. भारताने प्रगती केली; पण आतंकवादी देश म्हणून स्वतःची ओळख निर्माण का झाली, हा विचार पाकने कधी केला आहे का ? अशा शब्दांत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत खडसावले.

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीच्या विरोधात गुन्हा नोंद

मुलांना दृष्ट लागण्यापासून वाचवण्याच्या नावाखाली त्यांचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवी एजाझ शेख याला अटक करण्यात आली आहे. विवाहित असणार्‍या या मौलवीला ३ मुले आहेत.

वापी (गुजरात) येथे सनातनच्या गुजराती संकेतस्थळाचे पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या हस्ते उद्घाटन

येथील संत पू. इंद्रवदन शुक्ल यांच्या शुभहस्ते २४ सप्टेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या गुजराती संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या मंगलप्रसंगी सनातनचे साधक उपस्थित होते. यानिमित्त पू. शुक्ल यांनी नूतन संकेतस्थळाला आशीर्वाद दिले.

(म्हणे) ‘भारत म्हणजे दक्षिण आशियामधील आतंकवादाची जननी !’

भारत म्हणजे दक्षिण आशियामधील आतंकवादाची जननी आहे, असे विधान पाकच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत मलीहा लोधी यांनी केले आहे. भारताकडून पाकच्या विविध भागांमध्ये आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध हातभट्ट्यांमध्ये वाढ होईपर्यंत पोलीस काय करत होते ?

‘दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे २६.८.२०१७ या दिवशी पोलिसांनी अवैध हातभट्टी मद्य अड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ सहस्र रुपये किमतीचे ३६ सहस्र ४०० लिटर गुळमिश्रित रसायन नष्ट केले.

अमरावती येथील श्री अंबादेवी संस्थानच्या भूमी व्यवहारात घोटाळा !

येथील श्री अंबादेवी संस्थानकडे भूमीसंबंधीची नोंदवही संग्रहित करण्यात न आल्याने भूमीची अद्ययावत माहितीच उपलब्ध नाही. संस्थानची बरीच भूमी विश्‍वस्तांनी विकली आहे.

गेल्या ४० वर्षांपासून जर्मनीतील महिलेकडून वृद्ध, आजारी आणि घायाळ झालेल्या गोवंशांची सेवा

येथील कोन्हई गावापासून काही अंतरावर राधा सुरभी गोशाळा आहे. येथे १ सहस्र २०० वृद्ध गाय, बैल आणि वासरू आहेत. यात विविध कारणामुळे आजारी असणारे गोवंश आहेत. ही गोशाळा सुदेवी दासी या गेल्या ४० वर्षांपासून निःस्वार्थपणे करत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF