नवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

दाभोलकर आणि पानसरे हत्येच्या अन्वेषणाप्रमाणे गौरी लंकेश हत्येचे अन्वेषण भरकटू देऊ नका !

सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना देशभक्त आहेत. असे असतांना गौरी लंकेश यांच्या दुर्दैवी हत्येचा आरोप नक्षलवादाशी जोडलेल्या संघटना हिंदुत्वनिष्ठांवर करत आहेत.

गौरी लंकेश यांच्या हत्येचे अन्वेषण करणारे पोलीस बिर्याणी झोडण्यात आणि प्रसारमाध्यमांना अन्वेषणाविषयी खोट्या बातम्या देण्यात मग्न !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात पोलीस काहीच अन्वेषण करत नाहीत. मैत्रीपूर्ण संबंध असणार्‍या पत्रकारांना हाताशी धरून ‘स्वतः खूप मोठा तपास करत आहोत’, अशा फुशारक्या मारणार्‍या बातम्या प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध करून घेणे

मोहरम आणि मूर्ती विसर्जन यांचे मार्ग सुनिश्‍चित करण्याचा आदेश

मोहरमनंतर श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचा बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हिंदुद्वेषी आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीच्या वेळी रहित केला.

हे आदिशक्ति, ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्यासाठी आम्हाला बळ दे !

‘अफझलखानरूपी नराधमाला वधण्यासाठी जशी तू शिवछत्रपतींच्या तलवारीचे तेज बनलीस, तसे भ्रष्टाचार, बलात्कार, धर्मांधता, जात्यंधता, गोहत्या आदी राष्ट्रद्रोही अन् धर्मद्रोही प्रवृत्तींच्या विरोधात संघटित होण्यासाठी आम्हालाही तेज दे !

(म्हणे) ‘जर मूर्तीविसर्जनावर बंधन घालणे लांगूलचालन आहे, तर मी मरेपर्यंत करत रहाणार !’

जर मोहरमसाठी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनावर बंधन घालणे हा मुसलमानांचे लांगूलचालन केल्याचा भाग असेल, तर जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत ते करत रहाणार.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात प.पू. पांडे महाराज यांच्या शुभहस्ते दैनिक सनातन प्रभातच्या नूतन ‘अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप’चे उद्घाटन !

या वेळी त्यांनी अ‍ॅन्ड्रॉईड भ्रमणभाषचे पूजनही केले. दैनिक सनातन प्रभातच्या सौ. रूपाली वर्तक यांनी दैनिक सनातन प्रभातच्या ‘अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप’ आवृत्तीविषयी प.पू. पांडे महाराज यांना माहिती दिली.

डेरा सच्चा सौदाच्या सिरसा येथील मुख्यालयाच्या भूमीखाली ६०० लोकांचे सांगाडे ?

येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयाच्या परिसरात भूमीखाली ६०० मानवी सांगाडे असल्याची माहिती अन्वेषणातून समोर आली आहे.

पोलीस संरक्षण दिलेल्या व्यक्तींना खरंच संरक्षणाची आवश्यकता आहे का, याचा आढावा घ्या ! – मुंबई उच्च न्यायालय

कुणाला संरक्षण हवे असल्यास त्यांनी खाजगी सुरक्षारक्षक नेमावेत. पोलीस हे खाजगी सुरक्षारक्षक नाहीत. स्वतःच्या सुरक्षेसाठी सरकारी तिजोरीतील पैशांचा अपव्यय का करायचा ? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला

नागपूर येथील रेल्वेस्थानकावर ३६ किलो स्फोटके जप्त

चेन्नई एक्सप्रेसने नेण्यात येणारी ३६ किलो स्फोटके नागपूर रेल्वेस्थानकावर १९ सप्टेंबर या दिवशी जप्त करण्यात आली. राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी उत्तरप्रदेशातील अनिल निगम याला अटक करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF