मेक्सिकोमधील भूकंपामध्ये २२६ हून अधिक जणांचा मृत्यू

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशाची राजधानी असलेल्या मेक्सिको सिटी शहराला २० सप्टेंबर या दिवशी ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. यात २२६ जणांचा मृत्यू झाला.

लष्कर-ए-तोयबा रोहिंग्या मुसलमानांना आतंकवादी बनवण्याच्या प्रयत्नात !

लष्कर-ए-तोयबा बांगलादेशमधील निर्वासितांच्या छावण्यात रहाणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना आतंकवादी बनवण्याच्या प्रयत्नात आहे, असे गुप्तचरांच्या माहितीतून समोर आले आहे.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीदेवीला यंदा तिरूपति देवस्थानाकडून शालू आल्यास नेसवणार नाही !

तिरूमला तिरूपति देवस्थानकडून जागरदिनी श्री महालक्ष्मीदेवीला पाठवला जाणारा शालू नेसवणार नाही. श्री महालक्ष्मी मंदिरातील श्रीपूजक आणि पुजारी हटाव संघर्ष समिती यांच्यात सध्या चालू असलेल्या वादाकडे देवस्थान समिती गांभीर्याने पहात आहे.

२५ लक्ष रुपयांच्या पुलासाठी ठेकेदाराला अडीच कोटी रुपये दिले !

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेंतर्गत ठिकपुर्ली (तालुका राधानगरी) येथे लोखंडी पूल उभारण्यात आला आहे. त्यासाठी निविदेतील मूळ किंमत २५ लक्ष रुपये असतांना ठेकेदारास अडीच कोटी रुपये अदा करण्यात आले.

महागाईच्या विरोधात ठाणे येथे काँग्रेसचे आंदोलन

जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतींमुळे महागाईचा निषेध करण्यासाठी येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तलावपाळी परिसरात पिंडदान करून, तसेच सरकारच्या नावाने केस काढून मुंडन करून सरकारचा निषेध केला.

‘पुजारी हटाव’ आंदोलन तात्पुरते स्थगित !

श्री महालक्ष्मी मंदिरात पगारी श्रीपूजक नियुक्त करण्याविषयी कायदा संमत करण्याचे आश्‍वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दिले आहे.

डोंबिवली येथे अपहरणकर्ता मनोरुग्ण असल्याचे सांगून तक्रार प्रविष्ट करण्यास टाळाटाळ

येथे तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा एका व्यसनी तरुणाने केलेला प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला; मात्र रामनगर पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या व्यसनी तरुणावर कारवाई न करता त्याला फ्राईड राईस खाण्यास दिला.

पेठवडगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील विद्युत आस्थापनातील कनिष्ठ अभियंत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ जणांना ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा !

पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील राज्य विद्युत वितरण आस्थापनाचे कनिष्ठ अभियंता संदीप गावडे (वय ३५ वर्षे) यांच्यावर रॉकेल आणि इंजिन ऑईल ओतून त्यांना पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ६ जणांना न्यायालयाने १८ सप्टेंबरला दोषी ठरवले.

नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी सातारा येथे प्रशासनास निवेदन सादर

सार्वजनिक नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून तो आदर्शरित्या साजरा करण्यात यावा, यासाठी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी सौ. श्‍वेता सिंघल आणि पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांना निवेदन देण्यात आले.

२ वर्षांत जिहादी विचारांनी भरकटलेल्या ६६ सुशिक्षित तरुण-तरुणी यांना मुख्य प्रवाहात आणले – अतुलचंद्र कुलकर्णी, प्रमुख, आतंकवादीविरोधी प्रमुख, महाराष्ट्र राज्य

जिहादी विचारांनी डोकी भडकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणणे, हे देशभरातील सुरक्षा यंत्रणेसमोरील मोठे आव्हान आहे.


Multi Language |Offline reading | PDF