मुंबादेवी देवस्थान समिती विसर्जित करून शासनाने मंदिर कह्यात घेण्याची मागणी

श्री साई संस्थान, श्री सिद्धीविनायक मंदिर, पंढरपूर देवस्थान, तुळजापूर देवस्थान आणि श्री महालक्ष्मी देवस्थान कह्यात घेऊन त्यांचा ज्याप्रमाणे विकास केला आहे, त्याप्रमाणे मुंबादेवी मंदिर आणि मंदिराच्या परिसराचा विकास करण्यासाठी

मुंबईत १५ दिवसांत डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू

पावसामुळे ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असून सप्टेंबर २०१७ च्या पहिल्या पंधरवड्यात डेंग्यूमुळे तीन जणांचा मृत्यू झाला.

मराठी शाळा टिकल्या, तरच मराठी भाषा टिकेल ! – मराठी अभ्यास केंद्र

‘मुलांना इंग्रजी माध्यमात घालून आम्ही त्यांना घरी मराठी शिकवू’ ही भूमिका फसवी असून मराठी शाळा टिकल्या, तरच मराठी भाषा टिकेल, असा सूर मराठी अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

नवरात्रोत्सव आणि इतर सणांच्या वेळी श्री महालक्ष्मीची पूजा विविध देवी रूपांत पुन्हा बांधावी ! – श्री अंबाबाई भक्त समितीची मागणी

संपूर्ण जगभरात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचे भक्त आहेत. प्रतीवर्षी लक्षावधी भाविक देवीच्या दर्शनाला येथे येतात. ही देवी जगत्जननी आदिमाया असून ती सर्व दैवी रूपांत भाविकांना दर्शन देत होती.

पिसुर्ले (डिचोली, गोवा) येथील गोवंशियांच्या तस्करीत महाराष्ट्रातील टोळी कार्यरत असल्याचा संशय

पिसुर्ले येथे काही दिवसांपासून शेतकर्‍यांची गुरे अचानक गायब होत आहेत. या प्रकारामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्रातील एक टोळी कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महानिर्मितीचे १५ संच बंद

महानिर्मितीचे कोळशावर आधारित ३० पैकी १५ वीजनिर्मिती संच विविध कारणांनी बंद आहेत. ८ संच केवळ कोळशाच्या तुटवड्यामुळे बंद असून सातही प्रकल्पात १० दिवस पुरेल एवढाही कोळसा नाही. हा साठा आणखी न्यून झाल्यास भारनियमनात वाढ होईल.

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन

येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुंबईमध्ये मध्य, पश्‍चिम आणि कोकण रेल्वेमार्गावर येत्या ५ वर्षांत नवीन ४५ स्थानके उभारण्यात येणार

येत्या ५ वर्षांत मध्य, पश्‍चिम आणि कोकण रेल्वेमार्गावर नवीन ४५ रेल्वेस्थानके उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे.

मोहरमनिमित्त श्री दुर्गा विसर्जनावरील बंदी उठवावी ! – ज्योतीराम गोरे, भाजप

भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हटले जाते. सर्वांना त्यांच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य राज्यघटनेने दिले आहे; मात्र ते तुडवून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिंदूंच्या स्वातंत्र्यावर गदा आणून आपली मनमानी करत आहेत.

१४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या दिवाळीच्या कालावधीत एस्टी महामंडळाकडून भाडेवाढ

दिवाळीत एस्टीच्या दरात भाडेवाढ करण्यात आल्याने १४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवास करणार्‍या प्रवाशांना जास्त भाडे द्यावे लागेल. सर्व प्रकारच्या बस सेवांमध्ये ही वाढ १० ते २० टक्के एवढी करण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF