बांगलादेशमध्ये धर्मांधांनी अपहरण करून धर्मांतर केलेल्या अल्पवयीन हिंदु मुलीची बांगलादेश मायनॉरिटी वॉचच्या प्रयत्नामुळे सुटका

बांगलादेशच्या किशोरगंज जिल्ह्यातील कोटियाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ धर्मांधांनी एका १५ वर्षीय हिंदु मुलीचे नुकतेच अपहरण केले आणि तिचे बळजोरीने इस्लाममध्ये धर्मांतर केले.

देशाच्या सुरक्षेच्या अंतर्गत धर्मांधांना रोखण्यासाठी चीनकडून धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध

देशांतर्गत धर्मांधांना रोखण्यासाठी चीनच्या स्टेट काऊन्सिलकडून घटनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

हिंदु संघटकाने आदर्श असायला हवे ! – नागेश गाडे, केंद्रीय समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र हे एक प्रभु श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या आदर्श वृत्तीच्या व्यक्तींचे एकत्रिकरण आहे. त्यामुळे त्याची पायाभरणी आदर्शवतच असायला हवी.

गंधाक्ष वाद्यपथकाने गणेशमूर्ती पुष्कळ पाणी असलेल्या ठिकाणी पुन्हा विसर्जित केल्या !

थेरगावमधील केजुबाई बंधार्‍याजवळील विसर्जन घाटावर नदीचे पाणी न्यून झाल्याने गणेशोत्सव काळात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती पुन्हा काठावर आल्या होत्या.

जिहादी आतंकवादाचे बळी ठरलेल्या काश्मिरी हिंदूंना पुणे येथे श्रद्धांजली

जिहादी आतंकवादाचे बळी ठरलेल्या, तसेच धर्मपरिवर्तन न करता हिंदु धर्मातच राहून प्रसंगी मरण पत्करलेल्या काश्मिरी हिंदूंना १४ सप्टेंबर या दिवशी काश्मिरी हिंदू बलिदानदिनानिमित्त येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कल्याण येथे धर्मांध चोराचे पोलीस अधिकार्‍यावर प्राणघातक आक्रमण !

सापळा रचून पकडलेल्या भ्रमणभाष चोराने पोलीस चौकीतच तुटलेल्या काचेने पोलीस निरीक्षक सूर्यकांत पवार यांच्यावर सपासप वार केले.

कारागृहातील कैदी गुलाम नाहीत, त्यांना चांगली वागणूक द्या ! – सर्वोच्च न्यायालय

कारागृहातील कैदी म्हणजे गुलाम नाहीत. त्यांच्याशी मानवतावादी दृष्टीकोनातून व्यवहार करायला हवा. कायद्याच्या प्रक्रियेमुळे जे कैदी अनेक वर्षांपासून कारागृहात शिक्षा भोगत आहेत, त्यांना चांगली वागणूक दिली गेली पाहिजे

गोंदिया येथे बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची हत्या करणार्‍याला अटक

येथील एका गावात बैलपोळ्याच्या दिवशी मधू चोले (वय ४५ वर्षे) याने मांस खाण्यासाठी बैलाची कत्तल केली. गावकर्‍यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याला गोवंश हत्येप्रकरणी अटक केली.

अर्जन सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भारतीय वायूदलाचे मार्शल आणि फाइव्ह स्टार रँक प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांच्या पार्थिवावर १८ सप्टेंबरला देहलीतील बरार स्क्वेअरमध्ये सैनिकी मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोकण रेल्वेच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही ! – सुरेश प्रभु, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री

रेल्वेच्या झालेल्या अपघातांचे दायित्व स्वीकारून रेल्वेमंत्रीपदाचे मी त्यागपत्र दिले. पंतप्रधानांनी माझा सन्मान राखून तेवढ्याच तोलामोलाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय दिले आहे. रेल्वेमंत्री असतांना कोकण रेल्वेच्या विकासासाठी मी झुकते माप दिले. या कालावधीत हाती घेतलेल्या प्रकल्पांवर माझ्या त्यागपत्रामुळे कोणताही परिणाम होणार नाही.


Multi Language |Offline reading | PDF