बंगालमध्ये गो-तस्करांकडून सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या

बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यामधील बांगलादेशच्या सीमेवर गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या केली. सैनिकाने गईघाटा येथे गोतस्करांचा ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याची हत्या करण्यात आली.

बडोदा (गुजरात) येथे मोहरमच्या ताजियासाठी वर्गणी न दिल्यामुळे धर्मांधाकडून हिंदूची हत्या

येथील रंग वाटिकाजवळील व्हुडा निवासस्थानात रहाणारे ५७ वर्षीय मनोहर वारिया यांची त्यांच्या शेजारी रहाणारा नाझीर पठाण (वय ३५ वर्षे) याने मोहरमनिमित्त निघणार्‍या ताजियासाठी वर्गणी दिली नाही म्हणून हत्या केली.

(म्हणे) ‘रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती !’

रोहिंग्या मुसलमान आतंकवादी नाहीत, तर सामान्य व्यक्ती आहेत. केंद्र सरकारने त्यांना साहाय्य केले पाहिजे, असे आवाहन बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

(म्हणे) ‘पेट्रोल-डिझेल विकत घेणारे उपाशी मरत नाहीत !’ – केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोन्स

चारचाकी आणि दुचाकी असणारेच पेट्रोल आणि डिझेल विकत घेतात. या गाड्यांची मालकी असणार्‍या व्यक्ती कधी उपाशी मरत नाहीत, असे सांगत केंद्रीय पर्यटनमंत्री केेे.जे. अल्फोन्स यांनी पेट्रोल आणि डिझेल….

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाकडून ‘लेखकाची आध्यात्मिक पातळी आणि आध्यात्मिक स्थिती यांचा त्याच्या वाङ्मयावर होणारा परिणाम’ या विषयावर शोधनिबंध सादर

कल्याण (जिल्हा ठाणे) येथील उच्च शिक्षण आणि संशोधन केंद्राच्या वतीने पुणे येथे ‘धर्म, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर १५ आणि १६ सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

सप्तश्रृंगी गडावर या वर्षीपासून बोकडबळी प्रथेला बंदी !

ऐन नवरात्रीच्या तोंडावर सप्तश्रृंगी मंदिर प्रशासनाने बोकडबळी प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुरोगामी गेली काही वर्षे ही प्रथा बंद करण्याच्या सिद्धतेत होते. या प्रथेमागे मोठी आर्थिक उलाढाल असल्याचा आरोप पुरोगाम्यांनी केला आहे.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात डॉ. झाकीर नाईक यांचे नाव घेण्यास मज्जाव करणारे पोलीस !

नवी सांगवी, पुणे येथील साई चौकात २० ऑगष्ट २०१७ या दिवशी मूर्तीदानाच्या विरोेधात राष्ट्रीय हिंदू आंदोलन चालू होते. त्या वेळी एका साहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आंदोलनस्थळी येऊन कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

भरकटलेल्या समाजाला पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची नितांत आवश्यकता !

१०.३.२०१७ या दिवशी सकाळी दैनिक सनातन प्रभातचे वाचन करतांना त्यातील एक सदर समर्थ आणि काही वृत्ते (बातम्या) यांकडे माझे लक्ष वेधले गेले अन् पालटलेल्या काळाचे मला तीव्रतेने भान झाले.

नवरात्रोत्सवानिमित्त सनातन शॉपवर देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारे सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्यावर १० टक्के सवलत ! 

नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवीच्या उपासनेचे शास्त्र सांगणारी सनातनची मराठी भाषेतील प्रकाशने आणि सात्त्विक उत्पादने यांवर सनातन शॉपच्या माध्यमातून करण्यात येणार्‍या खरेदीवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF