लोकलगाडीत जागेसाठी गुंडगिरी करणार्‍या १५ ते २० महिला रेल्वे सुरक्षा दलाच्या कह्यात

लोकलमध्ये जागेसाठी गुंडगिरी करणार्‍या १५ ते २० महिलांना कल्याण येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी कह्यात घेतले.

कृत्रिम हौदातील गणेशमूर्तींचे अवशेष पुन्हा नदीत विसर्जित !

महानगरपालिकेने भाविकांचा विरोध झुगारून कृत्रिम हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा आग्रह धरला होता. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत नदीकाठांवर अनुमाने ५७ ठिकाणी कृत्रिम हौद बांधण्यात आले.

जळगाव येथे ट्रकमधून कत्तलीसाठी ४२ गायी-वासरांना नेणार्‍या ४ धर्मांधांवर गुन्हा प्रविष्ट

रावेर येथील आंबेडकर चौकात मध्यरात्री नाकाबंदीच्या कालावधीत मध्यप्रदेशातील परवाना असलेल्या ट्रकमध्ये ३ मृत गायी आणि ४२ गायी-वासरे दाटीवाटीने पाय बांधून कोंबलेल्या स्थितीत आढळून आले.

कल्याण येथे शासकीय योजनेचे आमिष दाखवून फसवणूक करणार्‍या दोघांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

पंतप्रधान कौशल्य योजनेअंतर्गत विनामूल्य प्रशिक्षण देण्याचे विज्ञापन देत २ महिलांची १ लक्ष १६ सहस्र २५० रुपयांची फसवणूक करणारे अविनाश कळंबकर आणि हेमांगी चौधरी यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

जळगाव येथील रस्तालूट प्रकरणात पोलीस हवालदार कह्यात

जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील नेरी गावाजवळील भवानी मंदिराजवळ दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटण्यात आले. या प्रकरणी एका हॉटेल चालकाच्या साहाय्याने दोन जणांना कह्यात घेण्यात आले.

विजयपूर (कर्नाटक राज्य) येथे दोन गावठी पिस्तुलांसह सात जिवंत काडतुसे शासनाधीन

येथील इंडी परिसरातील ग्रामीण भागात गेल्या १ मासापासून अनेक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे पोलिसांनी शासनाधीन केले आहेत. ११ सप्टेंबर या दिवशी पुन्हा दोन गावठी पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे शासनाधीन केल्याची घडना नंद्राळ येथे घडली.

अमित शहा गुजरातीमधून मराठ्यांचा इतिहास लिहिणार

छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे अध्यक्ष श्री. अमित शहा गुजरातीमधून मराठ्यांचा इतिहास लिहिणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची सूरतेची लूट एवढेच चित्र गुजरातमध्ये रंगवले जाते.

विवाह जुळवण्याच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी जवळीक साधून पैसे उकळणारा नायजेरियन नागरिक कह्यात

विवाह जुळवण्याच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून विवाहासाठी इच्छुक असलेल्या महिलांशी जवळीक करून त्यांच्याकडून पैसे उकळणार्‍या नायजेरियन नागरिकाला येथील वागळे इस्टेट पोलिसांनी कह्यात घेतले.

हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाविषयी मुख्यमंत्र्यांकडून केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना पत्र

२९ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अतीवृष्टीनंतर ३० ऑगस्टलाही मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे येथील शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली, तसेच मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी देण्यात आली.

बिलिव्हर्सवाल्यांनी दाखल केलेल्या खोट्या खटल्यातून धर्माभिमानी अंकित साळगावकर यांची निर्दोष मुक्तता

बिलिव्हर्सपंथीय पास्टर डॉम्निक यांची पत्नी जुआव डिसोझा हिने कायसूव येथील धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांच्या विरोधात पाठलाग करून सतावणूक केल्याची खोटी तक्रार केली होती. या खटल्यातून श्री. अंकित साळगावकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF