मानवाधिकारांच्या शूरविरांनी एकदातरी बंगालधील हिंसाचाराचे वार्तांकन करावे ! – अमित शहा, भाजपचे अध्यक्ष

मानवाधिकाराच्या शूरविरांनी देहलीतून बाहेर पडून बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून भाजप कार्यकर्त्यांवरील आक्रमणांच्या घटनांना समोर आणले पाहिजे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

मध्यप्रदेशातील शाळांमध्ये वर्गात हजेरी देतांना विद्यार्थी ‘येस् सर्/येस् मॅडम्’ऐवजी ‘जय हिंद’ म्हणणार !

विद्यार्थ्यांनी हजेरी देतांना ‘येस् सर्’ किंवा ‘येस् मॅडम्’ऐवजी ‘जय हिंद’ म्हणावे, असा आदेश मध्यप्रदेश सरकारचे शिक्षणमंत्री कुंवर विजय शाह यांनी काढला आहे. एक ऑक्टोबरपासून हा आदेश लागू होणार आहे.

मी भारतीय असल्याने पोपनी तुच्छतेची वागणूक दिली ! – ख्रिस्ती धर्मगुरूचा आरोप

मी भारतीय असल्याने पोप यांना माझी किंमत वाटली नाही, जर मी युरोपीय असतो, तर मला गांभीर्याने घेण्यात आले असते. माझे इसिसने अपहरण केले असतांना व्हॅटीकनने मला कुठलेच साहाय्य केले नाही, असा आरोप येमेन येथून सुटका झालेले भारतातील पाद्री टॉम उझुन्नलील यांनी एका चित्रफितीत केला आहे.

‘पाकव्याप्त काश्मीरमधून ७३ टक्के लोकांना वेगळे व्हायचे आहे’, असे सर्वेक्षणातून मांडणार्‍या दैनिकावर पाकची बंदी

पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक विक्री होणारे उर्दू वृत्तपत्र ‘डेली मुजादाल’ यावर बंदी घातली आहे, असे वृत्त ‘रिपब्लिक’ वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोट येथून प्रसिद्ध होणार्‍या या दैनिकाने येथील लोकांमध्ये एक सर्वेक्षण केले होते.

बनावट पर्यावरण दाखल्याच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा खाण व्यवसाय केल्याच्या प्रकरणी इम्रान खान याला अटक

राज्यातील खाण घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष अन्वेषण पथकाने १२ सप्टेंबरला सायंकाळी सांगे येथील खाण चालवणार्‍या इम्रान खान या व्यावसायिकाला अटक केली.

पिळर्ण येथील श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी चोरणार्‍यास अटक

येथील श्रीकृष्ण मंदिरातील दानपेटी चोरणार्‍या जेम्स गावीत या व्यक्तीला ग्रामस्थांनी पोलिसांकडे सोपवले. जेम्स यांच्यावर कलम ४५७ आणि ३८० यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना आव्हान देणारे नीतेश राणे स्वत: एकटे कधी फिरणार ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा मोठा वाटा आहे. अशा प्रसिद्ध इतिहासतज्ञावर एकतर्फी टीका करून आमदार नीतेश राणे यांनी सिंधुदुर्गची मान खाली घातली आहे.

गोवा अमली पदार्थमुक्त करण्याचा दिनांक निश्‍चित करा !

गोवा अमली पदार्थमुक्त करण्यासंबंधी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी एक दिनांक निश्‍चित केला पाहिजे, अशी मागणी भाजपचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी केली आहे.

सुकूर, वाडे येथील श्री वेताळ मंदिरात चोरी

सुकूर, वाडे येथील श्री वेताळ मंदिरात १२ सप्टेंबरच्या रात्री चोरी झाली. चोरांनी मंदिराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून देवाचा चांदीचा ऐवज आणि अर्पणपेटीतील सुमारे ५ सहस्र रुपये यांची चोरी केली. या मंदिरात झालेली ही दुसरी चोरी आहे.

विद्यालयांच्या व्यवस्थापनाने अमली पदार्थ या समस्येकडे एक गंभीर विषय म्हणून पाहिलेले नाही ! – नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो

विद्यालयांचे व्यवस्थापन आणि समाज यांनी अमली पदार्थ व्यवसाय रोखण्यासाठी सक्रीयपणे कार्य करणे आवश्यक आहे. त्यांनी केवळ पोलीस आणि शासन यांना दोष देऊन चालणार नाही, अशी माहिती नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.


Multi Language |Offline reading | PDF