आखाडा परिषदच भोंदू ! – बृहस्पति गिरी यांचा आरोप

अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून १४ भोंदू बाबांची सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात सिद्धेश्‍वरी गुप्त महापिठाचे महंत कुश मुनि यांचेही नाव आहे. त्यामुळे त्यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंस नरेंद्र गिरी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

सनातन प्रभातच्या प्रतिनिधीला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्यास सांगितले !

शासकीय विश्रामगृहात श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी सनातन प्रभातचे पत्रकार श्री. संकल्प झांझुर्णे यांचा अवमान करून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पुणे) ३९ प्राथमिक शाळा विद्यार्थी उपस्थितीअभावी बंद

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांतील १०-२० पेक्षा अल्प पट असलेल्या विद्यार्थी संख्येच्या ३९ शाळा बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातनच्या विरोधात जाणीवपूर्वक अफवा पसरवण्याचा प्रयत्न

‘गौरी लंकेश हत्या प्रकरणात सनातनचीही चौकशी करण्यात येत आहे’, अशा प्रकारचे धादांत खोटे आणि सनातनची अपकीर्ती करणारे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांकडून १०० हून अधिक हिंदूंची हत्या

रोहिंग्या मुसलमान आतंकवाद्यांनी १०० हून अधिक हिंदूंची हत्या केली आहे. या हत्यांमुळे सहस्रो हिंदूंना पलायन करून बांगलादेशमधील शरणार्थी शिबिरामध्ये रहावे लागत आहे.

अकोला येथे धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात शासनाकडे तक्रार !

गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयात विनामूल्य उपचार मिळण्याच्या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात दारिद्य्ररेषेखालील रुग्णांना नि:शुल्क आणि सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा उपलब्ध करणे आदी गोष्टी बंधनकारक आहे

यंदाच्या नवरात्रोत्सवापासून अंबाबाई मंदिरातील बळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय !

येथील ब्राह्मणपुरी येथे असलेल्या श्री अंबाबाई मंदिरात अनुमाने ३०० वर्षांपासून चालू असलेली मेंढीचा बळी देण्याची प्रथा विश्‍वस्त समिती आणि पुजारी यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात मेंढीऐवजी कोहळा कापण्यात येणार आहे.

देहलीतील ख्रिस्ती मिशनरींच्या रेयान शाळेतील पाद्य्रांच्या कुकर्मांचीही चौकशी व्हावी ! – दारा सेना

देहलीतील रेयान या कॉन्व्हेंट शाळेत काही दिवसांपूर्वी प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षांच्या विद्यार्थ्याची प्रसाधनगृहात हत्या करण्यात आली. पोलिसांनी शाळेच्या बसच्या वाहकाला या प्रकरणी अटक केली.

बुलढाणा येथील हिवरा आश्रमात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अ.भा.अंनिसचा विरोध

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे होणार आहे. बुलढाण्याच्या हिवरा आश्रमात होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे.

सरकारी बँकांकडे असलेली श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावरील थकीत अनुत्पादित कर्जे म्हणजे देशापुढील सर्वांत मोठी समस्या !

देशातील सरकारी बँकांकडे श्रीमंतांची मोठ्या प्रमाणावर थकीत अनुत्पादित कर्जे आहेत. ती देशापुढील सर्वांत मोठी समस्या आहे, असे मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी १० सप्टेंबर या दिवशी व्यक्त केले.


Multi Language |Offline reading | PDF