चिनी खेळांना उत्तेजन देणारे पोलीस !

‘गणेशोत्सव मंडळांसमोर जुगार खेळण्याऐवजी मनोरंजनासाठी कॅरम, सापशिडी, बुद्धीबळ या खेळांच्या जोडीला चायनीज ट्रेकर, लुडो (चिनी खेळ) असे विविध प्रकारचे खेळ खेळावेत.

भारतात १ मिनिटाला १ अपघात – १ घंट्यात १७ मृत्युमुखी !

एका वर्षात ४ लाख ८० सहस्र ६५२ अपघात झाले असून त्यात १ लाख ५० हजार ७८५ लोकांना जीव गमवावा लागला आहे. म्हणजे भारतात एका तासाला ५५ अपघात म्हणजे जवळपास मिनिटाला एक अपघात होतो, ज्यात घंट्याला १७ जण मृत्यूमुखी पडत आहेत.

घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकलणारच ! – गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू

म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुसलमान भारतात अवैधरीत्या रहात असल्याने त्यांना देशाबाहेर हाकलण्यात येईल. जगात सर्वांत अधिक निर्वासितांना भारतानेच आश्रय दिला असून रोहिंग्याविषयी सरकारला कुणी प्रवचन देण्याची आवश्यकता नाही

रोहिंग्या मुसलमानांवरील कारवाईवरून म्यानमारचा विरोध करणार्‍या पत्रकामध्ये सहभागी होण्यास भारताचा नकार !

इंडोनेशिया येथे आयोजित विश्‍व संसदीय मंचच्या संमेलनात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या नेतृत्वांतर्गत एक प्रतिनिधीमंडळ सहभागी झाले होते. या वेळी संमेलनाच्या वतीने एक पत्रक काढण्यात आले.

रा.स्व. संघ आणि भाजप कार्यकर्ते यांना मानवाधिकार नाही का ? – केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी बुद्धीवादी सामाजिक माध्यमांतून संघ आणि भाजप यांच्यावर टीका करत आहेत. मी त्यांना विचारू इच्छितो की, कर्नाटक आणि केरळ येथे मोठ्या संख्येने संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या तेव्हा ते गप्प का बसले होते ?

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी इमाम बुखारी यांना दिलेल्या आश्‍वासनाविषयी देहली उच्च न्यायालयाने माहिती मागितली

देहलीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांना ऑक्टोबर २००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पत्र लिहिले होते. याद्वारे त्यांनी जामा मशिदीला राष्ट्रीय संरक्षित स्मारक घोषित करणार नाही, असे आश्‍वासन दिले होते.

अक्कलकोट येथे १ लाख १५ सहस्र ९१५ रुपयांचा गुटखा जप्त !

येथे अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने केलेल्या तपासणीत शासनाने बंदी घातलेला गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांची विक्री अनेक ठिकाणी चालू असल्याचे निदर्शनास आल्यावर सहाय्यक आयुक्त संजय नारगुडे यांनी सुमारे १ लाख १५ सहस्र ९१५ रुपयांचा साठा जप्त केला.

(म्हणे) ‘कलम ३७० हटवणे अशक्य !’ – फारूक अब्दुल्ला

काश्मीरचे कलम ३७० हटवणे अशक्य आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक तज्ञांशी कलम ३७० विषयी एक समितीही नेमली होती; पण समितीने कलम ३७० हटवता येणार नसल्याचे म्हटले होते.

प्रमोद मुतालिक यांच्या गोव्यातील प्रवेशबंदीत वाढ

श्रीराम सेनेचे अध्यक्ष तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक यांच्यावर गोवा सरकारने पुढील ६० दिवसांसाठी गोव्यात येण्यास बंदी घातली आहे.

आतंकवाद्यांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणी श्रीनगर आणि देहली येथील १६ ठिकाणी धाडी

आतंकवाद्यांना पैसा पुरवल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून (एन्आयएकडून) चौकशी चालू आहे. या अंतर्गत यंत्रणेच्या पथकाने ६ सप्टेंबरला श्रीनगरमधील ११ आणि देहलीतील ५ ठिकाणी धाडी घातल्या.


Multi Language |Offline reading | PDF